गजा मारणे सोशल मीडिया
महाराष्ट्र

गजा मारणेला न्यायालयीन कोठडी; मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरण

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा कार्यकर्ता देवेंद्र जोग यांना कोथरूड भागात झालेल्या मारहाणीप्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणेवर गुन्हा दाखल झाला होता.

Swapnil S

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा कार्यकर्ता देवेंद्र जोग यांना कोथरूड भागात झालेल्या मारहाणीप्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणेवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. जोग यांनीच न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत मारहाण क्षणिक रागातून झाली असून कोणाच्या चिथावणीमुळे झाली नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयाने गजा मारणेला न्यायालयीन कोठडी सुनावली असून, अटकेतील तिघा आरोपींना ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

कोथरूड भागात १९ फेब्रुवारी रोजी दुचाकीस्वार संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना मारणे टोळीतील गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. जोग यांना मारहाण केल्याप्रकरणी गुंड गजा मारणे, साथीदार रूपेश मारणे, ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ, अमोल विनायक तापकीर, तसेच श्रीकांत उर्फ बाब्या संभाजी पवार यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली