संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : 'त्या' बँकांवर कारवाई करणार; आदिती तटकरे यांचा इशारा

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ दरमहा पात्र महिलांना देण्यात येत आहे. या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स, ईसीएस मँडेट रिटर्न, चेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाच्या रकमेतून कपात करून घेत आहेत.

Swapnil S

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ दरमहा पात्र महिलांना देण्यात येत आहे. या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स, ईसीएस मँडेट रिटर्न, चेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाच्या रकमेतून कपात करून घेत आहेत. अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिला आहे.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेबद्दल मंगळवारी मंत्रालयात राज्यस्तरीय आढावा बैठक (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) घेण्यात आली. या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे, सर्व जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी उपस्थित होते.

काही पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार सिडींग नसल्याने लाभ मिळत नाही. याबाबत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मदतीने २ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी. बँकेशी संबंधित अडचणी संदर्भात स्थानिक पातळीवर बैठका घ्याव्यात, अशा सूचनाही आदिती तटकरे यांनी बैठकीत उपस्थित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना दिल्या.

नांदेड जिल्ह्यात प्रत्यक्षात अर्ज भरताना लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले आणि पुरुषांचे आधार क्रमांक, अकाऊंट नंबर दिले गेले़ त्यामुळे पुरुषांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करून ज्या केंद्रांवर हे अर्ज भरण्यात आले त्या केंद्र चालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश यावेळी तटकरे यांनी दिले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी