Latur : शेकडो कोटी अवैधरीत्या परदेशात; CA ला अटक, आरोपीला ९ दिवसांची पोलीस कोठडी 
महाराष्ट्र

Latur : शेकडो कोटी अवैधरीत्या परदेशात; CA ला अटक, आरोपीला ९ दिवसांची पोलीस कोठडी

१६ बोगस (शेल) कंपन्यांच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपये बेकायदेशीरपणे परदेशात पाठवण्यासाठी बनावट प्रमाणपत्रे जारी केल्याच्या आरोपाखाली लातूर जिल्ह्यातील एका सनदी लेखापालाला (सीए) अटक करण्यात आली आहे.

Swapnil S

लातूर : १६ बोगस (शेल) कंपन्यांच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपये बेकायदेशीरपणे परदेशात पाठवण्यासाठी बनावट प्रमाणपत्रे जारी केल्याच्या आरोपाखाली लातूर जिल्ह्यातील एका सनदी लेखापालाला (सीए) अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव श्याम कलानी असे असून, उदगीर येथील न्यायालयाने त्याला सोमवारी ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आयकर विभागाने केलेल्या तपासणीत आणि सर्वेक्षणात हा संपूर्ण गैरव्यवहार समोर आला होता. या निष्कर्षांच्या आधारे २१ ऑगस्ट रोजी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एफआयआरनुसार, आरोपी सीए श्याम कलानी याने प्राप्तीकर नियमांतर्गत आवश्यक असलेल्या मूळ कागदपत्रांची आणि व्यवहारांची कोणतीही पडताळणी न करता परदेशात पैसे पाठवण्यासाठी फॉर्म १५-सीबी ची तब्बल १,८१० प्रमाणपत्रे जारी केली होती.

पोलीस तपासात दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत अस्तित्वात नसलेल्या किंवा बोगस असलेल्या १६ कंपन्यांमार्फत शेकडो कोटी रुपये परदेशात पाठवण्यासाठी या प्रमाणपत्रांचा गैरवापर करण्यात आला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कर्मचाऱ्यांची परत-पाठवणी; मंत्रालयात उसनवार आलेले अधिकारी जाणार माघारी, तोंडी नेमणुकाही रद्द, मुख्यमंत्र्यांचा दणका

रिक्षा-टॅक्सीचालकांना तीन महिने मुदतवाढ; मराठी शिकण्यासाठी आणखी अवसर, प्रशिक्षणाचा १ लाख ६५ हजार ८०० चालकांनी घेतला लाभ

मराठवाड्यात पेरणी क्षेत्रात ७ टक्के घट; पावसाने दिली ओढ, लागवड क्षेत्र ३.५ लाख हेक्टरने कमी

मध्य, पश्चिम रेल्वेवर लोकल खोळंबा; दिवा फाटक खुले राहिल्याने ९ गाड्यांची रखडपट्टी, भाईंदर येथे तांत्रिक बिघाड

पाटण्यात विद्यार्थ्यांचे जोरदार आंदोलन; लोकसेवा परीक्षांचा मुद्दा पेटला