कराडजवळील शहापूर येथे बिबट्याचा हल्ला; युवक गंभीर जखमी, परिसरात भीतीचे वातावरण 
महाराष्ट्र

कराडजवळील शहापूर येथे बिबट्याचा हल्ला; युवक गंभीर जखमी, परिसरात भीतीचे वातावरण

कराडपासून सुमारे १० किमी अंतरावरील शहापूर (ता. कराड) येथील रिसवड रस्त्यालगत असलेल्या पन्नाशी नावाच्या शेतशिवारात शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने एका युवकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.

Swapnil S

कराड : कराडपासून सुमारे १० किमी अंतरावरील शहापूर (ता. कराड) येथील रिसवड रस्त्यालगत असलेल्या पन्नाशी नावाच्या शेतशिवारात शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने एका युवकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात निखिल मारुती वांगडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कराड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निखिल वांगडे हे शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या हातांवर, चेहऱ्यावर आणि मानेवर जखमा झाल्या. मात्र त्यांनी धैर्याने हातातील खोऱ्याने प्रतिकार करत आरडाओरडा केल्याने पुढील अनर्थ टळला.

स्थानिकांच्या माहितीनुसार, शहापूर, वडोली निळेश्वर, शिरवडे आणि रिसवड परिसरात मागील महिनाभरापासून एका मादी बिबट्या आणि तिच्या दोन बछड्यांचा वावर वाढला आहे. काही दिवसांपूर्वी रिसवड येथे बिबट्याने शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना घडली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच जखमी युवकाची चौकशी करून आवश्यक मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे.

वन विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत रात्रीच्या वेळी एकटे शेतात न जाण्याचे आवाहन केले आहे. परिसरात बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पाळतही वाढविण्यात आली आहे.

Mumbai : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! हमाल, पार्किंग, एसी प्रतीक्षागृहाचे अधिकृत दर जाहीर; जादा पैसे घेतल्यास तक्रार करा

Delhi Govindpuri Fire : आग लागली की लावली? CCTV मध्ये संशयास्पद महिला कैद; घातपाताची शक्यता, महिलेचा शोध सुरू

सख्ख्या बहिणीची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला; काही वेळातच भावाने पोलिसांसमोर जाऊन दिली कबुली

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या; पोलिसांकडून तपास सुरू

माथेरानला जाण्याचा प्लॅन करताय? मग ही बातमी वाचाच; उद्यापासून चार महिने टॉय ट्रेन बंद, आता जायचं कसं?