महाराष्ट्र

Bank Holidays 2024: ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद राहणार? पहा सुट्ट्यांची यादी

List of Bank Holidays in August 2024: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये किती बँका बंद राहतील याबद्दल जाणून घ्या.

Tejashree Gaikwad

List of Bank Holidays in August 2024 in Maharashtra: आजपासून नवीन महिन्याची सुरुवात झाली आहे. आज १ ऑगस्ट पासून वेगवगेळे नियम बदलेले आहेत. यासोबत नवीन महिन्यात कोणत्या दिवशी बँकला सुट्टी असेल हे सुद्धा जाहीर केले जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑगस्ट महिन्याच्या बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. साधारणपणे, बँका दुसऱ्या, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आणि सर्व रविवारी बंद राहतात. याशिवाय राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सणांच्या दिवशीही बँका बंद राहू शकतात. स्वातंत्र्य दिनासारख्या राष्ट्रीय सणांना देशभरात बँका बंद असतात, तर राज्यस्तरीय सणांना बँका फक्त त्याच राज्यात बंद असतात. याचमुळे तुमची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून तुम्ही आधीच या महिन्यातील महाराष्ट्रातील सुट्ट्यांची यादी बघून घ्या.

ऐकून किती दिवस बँका बंद राहणार?

> ४ ऑगस्ट २०२४, रविवार - साप्ताहिक सुट्टी

> १० ऑगस्ट २०२४, दुसरा शनिवार

> ११ ऑगस्ट २०२४, रविवार - साप्ताहिक सुट्टी

> १५ ऑगस्ट २०२४, मंगळवार- स्वातंत्र्यदिन (राष्ट्रीय सुट्टी)

> १६ ऑगस्ट २०२४, बुधवार- पारशी नववर्ष

> १८ ऑगस्ट २०२४, रविवार- साप्ताहिक सुट्टी

> २४ ऑगस्ट २०२४, चौथा शनिवार

> २५ ऑगस्ट २०२४, रविवार- साप्ताहिक सुट्टी

या यादीनुसार महाराष्ट्र्रात ऐकून ८ दिवस बँका बंद राहणार आहेत. ही यादी फक्त महाराष्ट्रातील बँकांची आहे. याशिवाय संपूर्ण देशात वेगेवगेळ्या राज्यांना मिळून ऐकून १३ दिवसांची सुट्टी आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत