LPG ग्राहकांनो लक्ष द्या! e-KYC अनिवार्य; मोबाईलवर काही मिनिटांत पूर्ण करा ही प्रक्रिया 
महाराष्ट्र

LPG ग्राहकांनो लक्ष द्या! e-KYC अनिवार्य; मोबाईलवर काही मिनिटांत पूर्ण करा ही प्रक्रिया

घरगुती LPG ग्राहकांसाठी e-KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. Indane, भारत गॅस आणि HP गॅसच्या मोबाईल ॲपद्वारे Aadhaar FaceRD वापरून घरबसल्या काही मिनिटांत e-KYC पूर्ण करता येईल, असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सांगितले आहे.

Mayuri Gawade

पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असताना केंद्र सरकारने घरगुती LPG ग्राहकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सर्व घरगुती LPG ग्राहकांनी अनिवार्य e-KYC प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे सांगितले आहे. अनेक शहरांमध्ये LPG सिलिंडरच्या पुरवठ्यावर ताण निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सोशल मीडियावरील अधिकृत पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरणाद्वारे (e-KYC) ओळख पडताळणी करणे सर्व LPG ग्राहकांसाठी आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून अतिशय सोपी आहे. ग्राहक घरबसल्या स्मार्टफोनच्या मदतीने काही मिनिटांत e-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

e-KYC प्रक्रिया कशी पूर्ण कराल?

१) सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२) तेथून संबंधित तेल कंपनीचे मोबाईल ॲप डाउनलोड करा (Indane, भारत गॅस किंवा HP गॅस).
३) त्यानंतर Aadhaar FaceRD ॲप डाउनलोड करा.
४) तेल कंपनीच्या ॲपमध्ये दिलेल्या सूचनांनुसार FaceRD ॲपद्वारे चेहरा स्कॅन करून e-KYC प्रक्रिया पूर्ण करा.

मंत्रालयाने नागरिकांसाठी e-KYC प्रक्रिया सुरू करण्यासाठी X पोस्टमध्ये स्वतंत्र लिंकही उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना ही प्रक्रिया मोफत आणि काही मिनिटांत पूर्ण करता येते. त्यामुळे इंडेन, भारत गॅस किंवा HP गॅसच्या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे घरबसल्या e-KYC पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

AI मुळे नोकरीबाबत अनिश्चितता; तरुण-धोरणकर्त्यांमध्ये संवादाची गरज; नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष राजीव कुमार यांचा सल्ला

"सुरुवातीपासूनच सरकार आणि यंत्रणा त्यांना वाचवत होती"; बृजभूषण यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर विनेश फोगटची पहिली प्रतिक्रिया

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष; दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय

नागपुरात मैत्रीला काळीमा! ३ हजारांच्या उधारीपायी मित्रालाच संपवलं, दोघे अटकेत

Mumbai Ganesh Aagman 2026 : बाप्पाच्या आगमनाला सुरुवात! लालबाग-परळमध्ये जल्लोष; अनेक मूर्ती गुजरातकडे रवाना, VIDEO