पुणे-नांदेडमधील 'महाज्योती' व 'वनार्टी'ची परीक्षा ऐनवेळी रद्द; केंद्रावर तांत्रिक गोंधळ, विद्यार्थ्यांचा संताप संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

पुणे-नांदेडमधील 'महाज्योती' व 'वनार्टी'ची परीक्षा ऐनवेळी रद्द; केंद्रावर तांत्रिक गोंधळ, विद्यार्थ्यांचा संताप

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्यामार्फत विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेच्यावेळी बुधवारी पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला.

Swapnil S

पुणे : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) आणि स्व. वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) यांच्यामार्फत विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेच्यावेळी गोंधळ उडाल्याने पुणे आणि नांदेड केंद्रावरील परीक्षा रद्द करण्यात आली.

बुधवारी पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील परीक्षा केंद्रावर संगणक उपलब्ध नसल्याच्या तसेच संगणकीय प्रणालीवर लॉगिन करता येत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. तर, नांदेडमधील 'मराठवाडा ऑनलाइन एक्झाम सेंटर'मध्ये विजपुरवठा खंडित झाल्याने परीक्षा यंत्रणा बंद पडली. या गोंधळामुळे परीक्षा रद्द करण्यात आली.

परीक्षा केंद्रांवर नियोजनशून्य कारभार 

परीक्षा केंद्रावर पुरेसे संगणक उपलब्ध नसणे, त्यात तांत्रिक अडचणी आणि विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा देता न येणे, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. या प्रकारामुळे परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली आणि विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. महाज्योतीने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे आणि नांदेडमधील संबंधित केंद्रांवर होणारी चाळणी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षा रद्द करण्याचं कारण मात्र यात नमूद नाही.

फेरपरीक्षा १० ऑक्टोबरला

संबंधित दोन केंद्रांवरील विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा १० ऑक्टोबर रोजी घेतली जाणार असल्याचे समजते. या संदर्भातील सविस्तर सूचना लवकरच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

उच्चस्तरीय चौकशीची मागणी

नियोजित वेळेत परीक्षा सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी, आंबेगाव परीक्षा केंद्रातील संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, संबंधित केंद्राची जबाबदारी निश्चित करण्यात यावी आणि दोषी आढळणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

'महाज्योती' आणि 'वनार्टी' या संस्थांच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त गट 'ब' आणि 'क' पूर्वपरीक्षेच्या मोफत प्रशिक्षणासह शिष्यवृत्तीसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. तीन दिवस ही परीक्षा होत असून राज्यभरातून तब्बल ९०,६०० अर्ज प्राप्त झाले आहेत. ३२ शहरांतील ६४ परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

फडणवीसांच्या भेटीची कंत्राटदारांची मागणी; ८६ हजार कोटींची बिले थकीत

२०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र; 'आम्ही हे करून दाखवू' - मोदींनी दिला नवा नारा

शेतकऱ्यांवर पशुधन विक्रीची नामुष्की; चाऱ्याअभावी जनावरांचे दर २५ टक्क्यांनी घसरले

पाणीसाठा घटला, चिंता वाढली! मोडकसागर धरणातील साठा प्रथमच ७० टक्क्यांवर; स्विमिंग पूल, मनोरंजन क्लबचे पाणी होणार बंद