संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

महाराष्ट्रातून १०७ पाकिस्तानी बेपत्ता? महायुतीतच विसंवाद

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी रविवार हा शेवटचा दिवस होता.

Swapnil S

मुंबई : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी रविवार हा शेवटचा दिवस होता. दरम्यान, महाराष्ट्रात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी १०७ जण बेपत्ता असून ते कुठे लपले असतील, त्यांना पोलीस शोधून काढतील आणि तिथेच ठोकतील, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. मात्र, त्यावर स्पष्टीकरण देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता नाही, रविवारी रात्री किंवा सोमवारपर्यंत सर्वांना पाकिस्तानात पाठवण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे महायुतीत विसंवाद असल्याचे पुन्हा एकदा समोर आले.

“पाकिस्तानी नागरिकांना जे आश्रय देतील, त्यांनाही सोडणार नाही. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ देश सोडावा. काश्मीरमध्ये झालेला हल्ला दुर्दैवी होता. तिथे जाणे हे माझे कर्तव्य होते. त्यावरूनही राजकारण केले जात आहे,’’ असे शिंदे म्हणाले.

बेपत्ता पाकिस्तानी नागरिकांबाबत फडणवीस म्हणाले की, “गृहमंत्री म्हणून सांगतो की, यावर काहीही बातम्या करू नका. एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता नाही. जेवढे पाकिस्तानी आहेत ते सगळे सापडलेत. सगळे देशाबाहेर चाललेत. त्यांना बाहेर घालवण्याची व्यवस्था केली आहे. राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही. रविवारी संध्याकाळपर्यंत किंवा सोमवारपर्यंत सर्वांना परत पाठवण्यात येईल.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस