Maharashtra HSC Result 2026 : आज बारावीचा निकाल; ऑनलाईन चेक करा एका क्लिकवर, जाणून घ्या महत्त्वाची माहिती 
महाराष्ट्र

Maharashtra HSC Result 2026 : आज बारावीचा निकाल; ऑनलाईन चेक करा एका क्लिकवर, जाणून घ्या महत्त्वाची माहिती

महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल २ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जाहीर होणार असून विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईट, DigiLocker आणि SMSद्वारे निकाल पाहता येणार आहे.

किशोरी घायवट-उबाळे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी (२ मे) ला जाहीर होणार आहे. आज दुपारी १२ वाजता अधिकृत संकेतस्थळावर निकाल उपलब्ध होईल.

निकाल जाहीर करण्यापूर्वी सकाळी ११ वाजता पुणे येथील मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून परीक्षेसंदर्भातील माहिती दिली जाणार आहे.

१५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची प्रतीक्षा

महाराष्ट्र बोर्डाची बारावी परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च २०२६ या कालावधीत घेण्यात आली होती. प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान पार पडल्या होत्या. यंदाच्या महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षेसाठी सुमारे १५,३२,४८७ विद्यार्थी बसले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे २५ हजाराने वाढ झाली हाेती. राज्यातील ७ लाख ९९,७७३ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. निकाल अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करून दिला जाणार आहे.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट्स

विद्यार्थ्यांना निकाल पुढील वेबसाईट्सवर पाहता येईल:

याशिवाय DigiLocker आणि SMS सुविधेद्वारेही निकाल मिळवता येणार आहे.

ऑनलाइन निकाल कसा पाहाल?

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील प्रक्रिया करावी:

१. अधिकृत वेबसाईटवर जा.
२. रोल नंबर आणि आईचे पहिले नाव अचूक भरा.
३. आवश्यक माहिती भरल्यानंतर निकाल स्क्रीनवर दिसेल.
४. गुणपत्रिका डाउनलोड करून सेव्ह करा.

गुणपत्रिकेतील तपशील तपासणे महत्त्वाचे

निकाल डाउनलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेतील माहिती काळजीपूर्वक तपासावी.

  • विद्यार्थ्याचे नाव

  • आईचे नाव

  • मंडळाचे नाव

  • विषयांची माहिती

  • महाविद्यालय कोड

  • मिळालेले गुण

  • एकूण गुण

  • श्रेणी

  • पात्रता स्थिती

यामध्ये कोणतीही चूक आढळल्यास विद्यार्थ्यांनी तातडीने संबंधित शाळेशी संपर्क साधावा.

नवीन गुणपत्रिका स्वरूप लागू

यंदापासून मंडळाने गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र एकत्रित स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन स्वरूपात विद्यार्थ्याचा फोटो आणि QR कोडचा समावेश असेल, ज्यामुळे अधिकृत स्टेट बोर्ड ॲपद्वारे त्वरित पडताळणी करता येईल.

निकालानंतर पुढे काय?

निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील सुविधा उपलब्ध असतील:

  • उत्तरपत्रिकेची छायाप्रत (Photocopy of Answer Sheet)

    गुण पडताळणी (Verification of Marks)

    पुनर्मूल्यांकन (Revaluation)

यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३ मे ते १७ मे २०२६ दरम्यान सुरू राहणार आहे. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवणे आवश्यक असेल.

विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉरचे काम मार्च २०२७ पासून सुरू; MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाडांची ग्वाही

Mumbai : केबल्स चोरीमुळे कोस्टलवरील तिसरा डोळा बंद; ६० ते ६५ CCTV कॅमेरे निकामी, संबंधित पोलीस ठाण्यात २५ FIR दाखल

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन; काँग्रेस, ठाकरे बंधूंचे स्वतंत्र मोर्चे

मराठा आरक्षणाचे आंदोलनस्थळ ११२३ दिवसांनंतर अखेर रिकामे; मंडप, व्यासपीठ हटवले

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना आज; भारतीय युवा खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष