प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

मंत्रिमंडळ बैठकीसाठी १५० कोटींची उधळपट्टी; अहिल्यानगर बैठकीसाठी अवाढव्य खर्च

‘लाडकी बहीण योजने’सह अनेक योजनांमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती अडचणीत आली आहे.

गिरीश चित्रे

गिरीश चित्रे/मुंबई

‘लाडकी बहीण योजने’सह अनेक योजनांमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती अडचणीत आली आहे. त्यामुळे राज्य सरकार विविध निधींना कात्री लावत असतानाच अहिल्या नगर येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीवर १५० कोटी रुपये खर्च करण्याचा घाट फडणवीस सरकारने घातला आहे.

जामखेड येथील अहिल्यानगर, मौजे चौंडी येथे लाईट, सीसीटीव्ही कॅमेरा, साऊंड मंडप, ग्रीन रूम प्रसाधनगृह, वातानुकूलित यंत्रणा आदी गोष्टींची चोख व्यवस्था करण्याची लगबग सुरू आहे. या कामांसाठी १५० कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा मागवल्या आहेत. विशेष म्हणजे मौजे चौंडी येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडणार आहे.

राज्याच्या हिताचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येतात. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात येते. मंत्रिमंडळाच्या बैठका मंत्रालय किंवा सह्याद्री अतिथीगृहात पार पडतात. मात्र, एप्रिलच्या अखेरपर्यंत मंत्रिमंडळाची बैठक जामखेड येथे पार पडणार आहे. यासाठी युद्धपातळीवर तयारी करण्यात येत आहे. मौजे चौंडी, तालुका जामखेड येथे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीसाठी मुख्य मंडप, स्टेज बांधणे, ग्रीन रूम्स प्रसाधनगृह, वातानुकूलित यंत्रणा बसवणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करणे, बॅरिकेटिंगसह इतर कामे करणे, तसेच साईड मंडप तयार करणे आदी कामांसाठी अहिल्या नगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी निविदा मागवल्या आहेत. २८ एप्रिलपर्यंत ही कामे पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी गावात राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक लवकरच घेतली जाणार आहे.

हे प्रकल्प मंजुरीसाठी येणार

या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सृष्टी, संत ज्ञानेश्वर सृष्टी, भुईकोट किल्ला राज्य सरकारकडे हस्तांतरण करून संवर्धन, श्रीगोंदे येथील पेडगाव किल्ला येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक, जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांना मंजुरी, जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणे हे प्रमुख प्रकल्प मंजुरीसाठी मांडले जाणार आहेत.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास