महाराष्ट्रात बाल कुपोषणात लक्षणीय घट प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

महाराष्ट्रात बाल कुपोषणात लक्षणीय घट; 'नर्चर' प्रणाली बालकांच्या पोषणासाठी वरदान - अनुप कुमार यादव

राज्यातील अंगणवाडी केंद्रांमधील ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे वाढीचे संनियंत्रण मोठ्या प्रमाणात सुधारले असून, मोजमाप कार्यक्षमतेचे प्रमाण मार्च २०२३ मधील ७६.४५ टक्क्यांवरून मार्च २०२६ मध्ये ९९.७१ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

गिरीश चित्रे

मुंबई : राज्यातील अंगणवाडी केंद्रांमधील ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे वाढीचे संनियंत्रण मोठ्या प्रमाणात सुधारले असून, मोजमाप कार्यक्षमतेचे प्रमाण मार्च २०२३ मधील ७६.४५ टक्क्यांवरून मार्च २०२६ मध्ये ९९.७१ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. राज्याने बाल कुपोषण कमी करण्याच्या दिशेने लक्षणीय प्रगती साधली असून, महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘नर्चर’ या डिजिटल प्रणालीमुळे पोषण व्यवस्थापन अधिक परिणामकारक झाले आहे, अशी माहिती विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी दिली.

पोषणविषयक जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या समुदाय आधारित कार्यक्रमांची संख्या ४७,१६१ वरून २,१९,८९३ पर्यंत वाढली आहे, ज्यामुळे कुटुंब पातळीवर पोषणाबाबत जागरूकता वाढली आहे. अंगणवाडी सेविकांच्या गृहभेटींमध्येही मोठी वाढ नोंदविण्यात आली असून, मार्च २०२३ मधील ८८.३४ टक्के असलेले प्रमाण मार्च २०२६ मध्ये ९९.२९ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. यामुळे बालकांचे नियमित निरीक्षण व वेळेवर हस्तक्षेप शक्य झाला आहे.

पोषण ट्रॅकरच्या आधारे राज्यातील कुपोषणाच्या प्रमाणात लक्षणीय घट दिसून आली आहे. अतितीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण मार्च २०२३ मधील १.९३ टक्क्यांवरून मार्च २०२६ मध्ये ०.३० टक्क्यांपर्यंत घटले आहे. त्याचप्रमाणे मध्यम कुपोषण ५.०९ टक्क्यांवरून २.१० टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. गंभीर कमी वजन बालकांचे प्रमाण ४.५७ टक्क्यांवरून १.४१ टक्क्यांपर्यंत घटले असून, गंभीर खुंटलेली वाढ बालकांचे प्रमाण २४.६५ टक्क्यांवरून १०.१८ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.

वैद्यकीय देखरेखीखाली उपचार

‘नर्चर’ प्रणालीअंतर्गत प्रत्येक कुपोषित बालकाचा युनिक आयडीद्वारे मागोवा घेऊन त्यांना आवश्यकतेनुसार ग्राम/नागरी बालविकास केंद्रात विशेष पोषण आहार देण्यात येतो. तसेच गरजेनुसार पोषण पुनर्वसन केंद्रात संदर्भित करून वैद्यकीय देखरेखीखाली उपचार दिले जातात.

दर सहा महिन्यांनी मोहिमा राबवल्या जातात

एकूणच, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, क्षेत्रीय पातळीवरील मजबूत अंमलबजावणी आणि जनसहभाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्राने बाल कुपोषण निर्मूलनाच्या दिशेने ठोस व सकारात्मक पाऊल उचलले आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे पोषण स्थितीचे अचूक मूल्यमापन व कुपोषण निर्मूलनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या समन्वयाने दर सहा महिन्यांनी मोहिम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत बालकांचे वजन व उंची शास्त्रोक्त पद्धतीने मोजून त्याची माहिती पोषण ट्रॅकर ॲपमध्ये नोंदवली जाते.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत रंगत वाढली; शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांची माघार; काँग्रेसचे आकाश मोरे मैदानात ठाम

Puducherry Assembly Elections 2026 : मतदान केंद्रावर साडीतील रोबोट! पुदुच्चेरीत 'निला'कडून मतदारांचे स्वागत; VIDEO व्हायरल

Mumbai : ३१ मे पर्यंत १०० टक्के नालेसफाई पूर्ण करा! पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश

भोंदू अशोक खरात प्रकरण : अश्लील व्हिडिओ व्हायरल करणे महागात, गुन्हा दाखल

Navi Mumbai : सिडकोचा पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटीसह गृहनिर्माणावर भर; १६,२५० कोटींचा अर्थसंकल्प सादर