महाराष्ट्र

देवस्थान इनाम जमीन प्रारूपाला 'स्थगिती'

देवस्थानांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या मालकीच्या महाराष्ट्रातील जमिनींवरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी नियोजित 'महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, 2026' च्या सध्याच्या प्रारूपाला स्थगिती देऊन, सुधारित प्रारूप करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर येथे केली.

Swapnil S

मुंबई : देवस्थानांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या मालकीच्या महाराष्ट्रातील जमिनींवरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी नियोजित 'महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, 2026' च्या सध्याच्या प्रारूपाला स्थगिती देऊन, सुधारित प्रारूप करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर येथे केली.

नागरिकांना व देवस्थानांना या सुधारित प्रारूपावर १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या हरकती नोंदवता येतील. या संपूर्ण प्रक्रियेनंतर, आगामी डिसेंबर महिन्यातील विधिमंडळ अधिवेशनात देवस्थानांना मजबूत करणारा आणि त्यांचे हक्क अबाधित ठेवणारा अंतिम कायदा मंजुरीसाठी आणला जाईल, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

संभ्रम दूर करण्यासाठी नवे प्रारूप

दि. ६ मे २०२६ ते ५ जून २०२६ या कालावधीत या कायद्याचे प्रारूप जनतेच्या सूचना आणि हरकतींसाठी पब्लिक डोमेनवर उपलब्ध करून देण्यात आले होते. यावर मोठ्या प्रमाणात हरकती आल्यामुळे आणि काही घटकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी शासनाने तूर्तास याला स्थगिती दिली.

साडेपाच लाख हेक्टर देवस्थान इनाम जमिनी

राज्यामध्ये सुमारे साडेपाच लाख हेक्टर देवस्थान इनाम जमिनी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून देवस्थानांना मिळालेल्या या जमिनींवर सध्या मोठ्या प्रमाणावर बलाढ्य लोकांची अतिक्रमणे झाली आहेत. देवस्थान कमिट्या स्वतःहून ही अतिक्रमणे काढू शकत नाहीत. ज्याप्रमाणे 'वक्फ बोर्डा'च्या जमिनींवरील अतिक्रमणे काढून देण्याची तरतूद कायद्यात आहे, तसाच कडक कायदा देवस्थान जमिनींसाठी आणण्याचा सरकारचा मनोदय आहे. ज्या जमिनी १००-२०० वर्षांपासून वहिवाटीत आहेत किंवा जिथे कायदेशीर गुंतागुंत निर्माण झाली आहे, तिथे 'दोन्ही बाजूंचा फायदा होईल अशी स्थिती निर्माण करण्यासाठी कायद्यात विशेष कलमे समाविष्ट केली जातील, असे बावनकुळे यांनी सांगितले.

सुधारित प्रारूपासाठी उच्चस्तरीय समिती

५ जून २०२६ पर्यंत प्राप्त झालेल्या सर्व निवेदने आणि आक्षेपांवर सुनावणी घेऊन कायद्याचे नवीन प्रारूप तयार करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, यामध्ये विभागीय आयुक्त (पुणे व कोकण), जिल्हाधिकारी (ठाणे व अहिल्यानगर), श्रीमती मनीषा जायभाये (सहसचिव, जमीन-४), आणि अध्यक्षांनी निवडलेले सहसचिव उपसचिव असतील. राज्यातील विविध देवस्थानांचे १५ प्रतिनिधी (ज्यांची नियुक्ती महसूल मंत्र्यांमार्फत केली जाईल. तर सदस्य सचिव कैलास अर्जुन गायकवाड (सहसचिव, जमीन-७) यांचा समावेश असणार आहे.

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक

Navi Mumbai : खारघर हाफ मॅरेथॉनमुळे उद्या वाहतुकीत बदल; पहाटे ५ वाजल्यापासून 'या' मार्गांवर निर्बंध, वाहतूक पोलिसांकडून सूचना

मुंबईत ATS ची मोठी कारवाई! माहीममधून तरुणाला अटक; जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय

Philippines Plane Crash : प्रशिक्षणादरम्यान हवाई दलाच्या दोन विमानांची धडक; चार वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू, Video

Video : हॉस्टेलमध्ये 'अँटी-सुसाइड' पंखे; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुरतमधील विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय