ई-चलनाच्या दंडात २० टक्के सवलत; १ डिसेंबरपासून राज्यात अभय योजना लागू 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

ई-चलनाच्या दंडात २० टक्के सवलत; १ डिसेंबरपासून राज्यात अभय योजना लागू

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनचालकांना बजावण्यात आलेल्या प्रलंबित ई-चलनांच्या दंडात २० टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ‘महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलान अभय योजना-२०२६’ या नावाने ही योजना १ डिसेंबरपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात लागू होणार आहे.

Swapnil S

मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनचालकांना बजावण्यात आलेल्या प्रलंबित ई-चलनांच्या दंडात २० टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ‘महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलान अभय योजना-२०२६’ या नावाने ही योजना १ डिसेंबरपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात लागू होणार आहे. या योजनेमुळे प्रलंबित दंडाचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.

राज्याच्या गृह विभागाने २७ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भात शासन आदेश जारी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ई-चलन जारी करण्याबरोबरच दंडाची प्रत्यक्ष वसुली होणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवल्यानंतर राज्य सरकारने ही योजना आणली आहे. या योजनेची अंमलबजावणी तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात २१ जानेवारी २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत बजावण्यात आलेल्या आणि १ डिसेंबरला वसुलीसाठी प्रलंबित असलेल्या पात्र ई-चलनांच्या दंडावर २० टक्के सवलत मिळणार आहे. यासाठी वाहनचालकांना योजना लागू झाल्यापासून ३० दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरावी लागेल.

दुसऱ्या टप्प्यात १ डिसेंबर २०२६ पासून बजावण्यात येणाऱ्या पात्र ई-चलनांवरही २० टक्के सवलत मिळणार आहे. मात्र, चलन बजावल्याच्या तारखेपासून ४५ दिवसांच्या आत दंड भरल्यासच ही सवलत मिळेल. हा लाभ ३० नोव्हेंबर २०२७ पर्यंत आहे. तिसऱ्या टप्प्यात ३० जानेवारी २०१९ ते २० जानेवारी २०२६ या कालावधीत प्रलंबित असलेल्या पात्र चलनांवर २० टक्के सवलत देण्यात येणार आहे. अशा प्रकरणांत सवलतीनंतरची रक्कम ३० दिवसांच्या आत भरावी लागेल.

आदेशानुसार तडजोड प्रक्रिया

परिवहन विभागाने किंवा त्याच्या अंमलबजावणी यंत्रणेमार्फत जारी केलेल्या चलनांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय योजना सुरू होण्यापूर्वी भरलेल्या दंडाची रक्कम परत मिळणार नाही.

...तर वाहने जप्त

अभय योजनेचा कालावधी संपल्यानंतर वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर परवाना निलंबन, वाहन व्यवहारांवर निर्बंध तसेच वाहन जप्ती यांसारखी कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : लोकल प्रवाशांची गैरसोय होणार! मध्य रेल्वेसह ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवरही दुरुस्तीची कामे, वाचा सविस्तर

RBI ATM Rules : एटीएममधून पैसे काढणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोफत व्यवहार, शुल्क आणि अलर्टबाबत नवे नियम

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या अडचणीत वाढ; पाण्याच्या नमुन्यात बॅक्टेरिया, FSSAI कडून पुन्हा कारवाई

Afghanistan Blast : अफगाणिस्तानमध्ये शाळेजवळ भीषण स्फोट; ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ९७ जण जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

वडा खायला घेतला अन् दाताखाली आला लोखंडी बोल्ट; 'वंदे भारत'मधील प्रवाशाचा VIDEO व्हायरल, IRCTC ने दिली प्रतिक्रिया