महाराष्ट्र

राज्याला जीएसटीचा आर्थिक आधार; वर्षभरात २ लाख ५० हजार १९ कोटी जमा, १३ लाख व्यापाऱ्यांना जीएसटी भरणे होणार सुलभ

व्यापाऱ्यांना जीएसटी भरणे सुलभ व्हावे यासाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल.

गिरीश चित्रे

राज्यात १६ लाख व्यापारी असून यात २५ हजार व्यापारी अब्जावधी आहेत. तर १३ लाख किरकोळ व्यापारी असून जीएसटी पोटी या व्यापाऱ्यांनी २०२४ ते मे २०२५ पर्यंत २ लाख ५० हजार १९ कोटी रुपये भरले आहेत. त्यामुळे राज्याच्या तिजोरीसाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी लाभदायक ठरत आहे. व्यापाऱ्यांना जीएसटी भरणे सुलभ व्हावे यासाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल.

वस्तू व सेवाकर परिषदेच्या ५५ व्या बैठकीमध्ये केलेल्या शिफारशीनुसार २९ मार्च २०२५ रोजी पारित केलेल्या वित्तीय कायदा २०२५ अन्वये केंद्र सरकारने केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ व महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ यातील तरतुदींमध्ये एकसूत्रता व समानता राखण्यासाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ यामध्ये सुधारणा करणे गरजेचे होते.

असा मिळाला जीएसटीतून महसूल ( २०२५ - २६)

जीएसटी- १,७६,११९ कोटी रुपये

व्हॅट- ७०,३४५ कोटी रुपये

पीटी- ४,०२५ कोटी रुपये

एकूण महसूल जमा- २ लाख ५० हजार १९ कोटी रुपये

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video