Maharashtra HSC Exam 2027 : बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची वेळ बदलली प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

Maharashtra HSC Exam 2027 : बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची वेळ बदलली

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेतील अर्थशास्त्र विषयाच्या पेपरच्या वेळेत बदल केला आहे. हा पेपर पूर्वनियोजित १७ फेब्रुवारी २०२७ रोजीच होणार असून, आता तो सकाळच्या सत्राऐवजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत घेतला जाणार आहे.

Swapnil S

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेतील अर्थशास्त्र विषयाच्या पेपरच्या वेळेत बदल केला आहे. हा पेपर पूर्वनियोजित १७ फेब्रुवारी २०२७ रोजीच होणार असून, आता तो सकाळच्या सत्राऐवजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत घेतला जाणार आहे.

मूळ वेळापत्रकानुसार अर्थशास्त्राची परीक्षा सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होणार होती. मात्र, मंडळाने सुधारित वेळापत्रक जाहीर करून परीक्षेच्या सत्रात बदल केला आहे. हा बदल कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांतील अर्थशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना लागू असेल.

दरम्यान, बारावीच्या अन्य विषयांच्या तसेच दहावीच्या लेखी परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार आहे.

मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी विभागीय मंडळांना शुद्धिपत्रक प्रसिद्ध करून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना बदलाची माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया किंवा अनधिकृत संकेतस्थळांवरील वेळापत्रकांवर विश्वास न ठेवता शाळा-महाविद्यालयांकडून मिळणाऱ्या अधिकृत छापील वेळापत्रकानुसार परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सलग नवव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; सोने ५,२००, तर चांदी ४,००० रुपयांनी स्वस्त

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण : पार्थ पवार यांना दिलासा

प्रभादेवीत रेल्वेच्या कारवाईला स्थगिती; शिंदेंची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा; रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचे निश्चित झाल्याची दिली माहिती

तडजोड करणारे पंतप्रधान जागतिक नेत्यांशी चर्चा कशी करणार? राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र

गृहनिर्माण सोसायट्यांना दिलासा; ५० पेक्षा कमी सभासद संख्येच्या संस्थांची निवडणूक SGM मध्ये; महाराष्ट्र सहकारी संस्था नियमांत सुधारणा