Maharashtra Legislative Council Elections 2026: विधान परिषदेच्या ५ जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान 
महाराष्ट्र

Maharashtra Legislative Council Elections 2026: विधान परिषदेच्या ५ जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५ जागांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याची घोषणा भारत निवडणूक आयोगाने मंगळवारी केली. ७८ सदस्यांच्या विधान परिषदेतील काही सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने या द्वैवार्षिक निवडणुका घेतल्या जात आहेत.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५ जागांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याची घोषणा भारत निवडणूक आयोगाने मंगळवारी केली. ७८ सदस्यांच्या विधान परिषदेतील काही सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने या द्वैवार्षिक निवडणुका घेतल्या जात आहेत.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाईल. ६ डिसेंबर २०२६ रोजी निवृत्त होणाऱ्या विद्यमान सदस्यांच्या रिक्त जागी या निवडणुका होत आहेत.

  • पदवीधर मतदारसंघ (३ जागा): औरंगाबाद विभाग, पुणे विभाग आणि नागपूर विभाग

  • शिक्षक मतदारसंघ (२ जागा): अमरावती विभाग आणि पुणे विभाग

हे निवडणूक होणारे मतदारसंघ आहेत.

सतीश भानुदासराव चव्हाण- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ, अरुण गणपती लाड – पुणे पदवीधर मतदारसंघ, अभिजित गोविंदराव वंजारी – नागपूर पदवीधर मतदारसंघ, किरण रामराव सरनाईक – अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि जयंत दिनकर आसगावकर – पुणे शिक्षक मतदारसंघ हे सदस्य निवृत्त होणार आहेत.

निवडणुकीची अधिसूचना २९ सप्टेंबर रोजी जारी होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर आहे. तर अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर रोजी होणआर असून अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत ९ ऑक्टोबर आहे. या निवडणुकीसाठी मतदान २३ ऑक्टोबर रोजी होणार असून मतमोजणी: २७ ऑक्टोबरला होणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'वंदे मातरम्' न म्हणणाऱ्यांना शिक्षा नको; धार्मिक कारणास्तव 'वंदे मातरम्' नाकारणाऱ्यांना न्यायालयाचे घटनात्मक संरक्षण

मुख्यमंत्री आजपासून बांधावर! दुष्काळ पाहणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर; उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची घोषणा

परतीचा पाऊसही ठरणार अपुरा; दुष्काळाचे संकट अटळ, खरिपाच्या पिकांनाही फारसा दिलासा नाही

Mumbai : रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; धार्मिक उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही - हायकोर्ट

मतदार यादीतील दुरुस्तीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधी