'NCMC स्मार्ट कार्ड'ला उत्स्फूर्त प्रतिसाद; एसटीच्या कार्ड नोंदणीचा आठवड्यात १ लाखांचा टप्पा पार 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

'NCMC स्मार्ट कार्ड'ला उत्स्फूर्त प्रतिसाद; एसटीच्या कार्ड नोंदणीचा आठवड्यात १ लाखांचा टप्पा पार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) डिजिटल सेवांच्या दिशेने पाऊल टाकत ‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ उपक्रम हाती घेतला आहे. सवलतधारक प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आठवड्यात नोंदणीच्या संख्येने १ लाखांचा टप्पा गाठला आहे. यामध्ये ‘महिला सन्मान योजना’ लाभार्थ्यांचा सर्वाधिक सहभाग आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) डिजिटल सेवांच्या दिशेने पाऊल टाकत ‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ उपक्रम हाती घेतला आहे. सवलतधारक प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आठवड्यात नोंदणीच्या संख्येने १ लाखांचा टप्पा गाठला आहे. यामध्ये ‘महिला सन्मान योजना’ लाभार्थ्यांचा सर्वाधिक सहभाग आहे.

केवळ आठवड्याभरात या उपक्रमांतर्गत एकूण १ लाख २१ प्रवाशांनी ‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’साठी नोंदणी केली आहे. यात ‘महिला सन्मान योजना’ लाभार्थ्यांचा सर्वाधिक सहभाग असून तब्बल ३७ हजार ९२७ महिलांनी या आधुनिक सुविधेचा स्वीकार केला आहे. त्याचप्रमाणे ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेंतर्गत ३४ हजार ९४८ ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केली आहे. तसेच इतर ज्येष्ठ नागरिक २४ हजार ९२७ आणि इतर प्रवासी २ हजार २१९ अशा विविध घटकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

एसटी महामंडळाचा हा उपक्रम केवळ तांत्रिक बदल नसून, प्रवाशांच्या प्रवासाला अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक बनविण्याचा दूरदर्शी प्रयत्न आहे. रोख व्यवहारांच्या पारंपरिक चौकटीतून बाहेर पडत, डिजिटल माध्यमांचा स्वीकार करण्यासाठी प्रवासी मोठ्या प्रमाणात पुढे आले आहेत.

भविष्यात एनसीएमसी स्मार्ट कार्डमुळे सवलत धारक प्रवाशांना तिकीट खरेदी अधिक सुलभ होणार असून, भविष्यात एकच कार्ड विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी उपयोगात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ची सक्ती नाही

१ मार्चपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड असल्याशिवाय सवलत धारक प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, अशी अफवा समाज माध्यमांवर पसरली होती. तथापि, जोपर्यंत ८० टक्के सवलत धारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य केले जाणार नाही, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या जवळच्या बसस्थानक, आगार अथवा अधिकृत खासगी एजंटकडे स्मार्ट कार्ड नोंदणी करावी, असे आवाहन महामंडळातर्फे केले आहे.

भविष्यात सर्व वाहनांसाठी एकच कार्ड

भविष्यात एनसीएमसी स्मार्ट कार्डमुळे सवलतधारक प्रवाशांना तिकीट खरेदी करणे अधिक सुलभ होणार असून, भविष्यात एकच कार्ड विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी उपयोगात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. एसटी महामंडळाने हाती घेतलेला हा अभिनव उपक्रम डिजिटल महाराष्ट्राच्या स्वप्नाला साकार करण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल ठरत असून, प्रवाशांच्या विश्वासाच्या बळावर हा प्रवास अधिक वेगाने पुढे जात आहे असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.

मुंबईत मल्टी-मॉडेल भूमिगत बोगद्यांचे जाळे; वाहतूककोंडी, पूरस्थितीतून मुंबईकरांना मिळणार दिलासा

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात होणार बचत; प्रति किलोवॉट १५ हजारांचा होणार वीज ग्राहकांचा फायदा

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्धच्या पॅनल्सचे ऑडिटचे आदेश

Mumbai : चेंबूर बांधकाम दुर्घटना प्रकरणी कंत्राटदार, अभियंत्यासह चौघांवर गुन्हा दाखल

नागपूरला SBL कंपनीत भीषण स्फोट; १७ ठार, १८ जण जखमी; दारुगोळा तयार करताना सकाळी घडली घटना