पालिका, पंचायतींच्या रिक्त जागांचे निकाल जाहीर प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

पालिका, पंचायतींच्या रिक्त जागांचे निकाल जाहीर

राज्यातील १४ जिल्ह्यातील ८ नगरपालिका आणि १४ नगरपंचायतींमधील एकूण ४६ रिक्त पदांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक ११, तर त्यापाठोपाठ भाजपने ९ जागा जिंकल्या आहेत. ४६ पैकी ८ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते, तर तिर्थपुरी नगरपंचायतीतील एका जागेसाठी एकही उमेदवारी अर्ज न आल्याने ती जागा रिक्त राहिली आहे. त्यामुळे उर्वरित ३८ जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल रविवारी घोषित करण्यात आले.

Swapnil S

मुंबई : राज्यातील १४ जिल्ह्यातील ८ नगरपालिका आणि  १४ नगरपंचायतींमधील एकूण ४६ रिक्त पदांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक ११, तर त्यापाठोपाठ भाजपने ९ जागा जिंकल्या आहेत. ४६ पैकी ८ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते, तर तिर्थपुरी नगरपंचायतीतील एका जागेसाठी एकही उमेदवारी अर्ज न आल्याने ती जागा रिक्त राहिली आहे. त्यामुळे उर्वरित ३८ जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल रविवारी घोषित करण्यात आले.

राज्यातील १० जिल्ह्यातील ७ नगरपालिका आणि  ७ नगरपंचायतींमधील रिक्त पदांसाठी शनिवारी मतदान पार पडले. या निवडणुकांसाठी राज्यभरात ५१ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. मतदान प्रक्रियेसाठी ५१ ईव्हीएम यंत्रे तसेच तेवढ्याच संख्येने बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटचा वापर करण्यात आला.

या निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्याचा अहवाल प्राप्त झाला नसून सर्व मतदान केंद्रांवर मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया रविवारी राबवण्यात आली.

निकाल

काँग्रेस - ११

भाजप - ९

शिंदेसेना - ७

उद्धवसेना - २

शरद पवार गट - २

अजित पवार गट - १

इतर - १४

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

'लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या'; SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

यवतमाळमध्ये वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, Video

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या, Video व्हायरल