अणुवीज प्रकल्पात ७९ हजार कोटींची गुंतवणूक 
महाराष्ट्र

अणुवीज प्रकल्पात ७९ हजार कोटींची गुंतवणूक

वीजनिर्मिती क्षेत्रातील टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड या दोन कंपन्या राज्यात अणुवीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही कंपन्यांकडून ४ हजार २०० मेगावॅट क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत.

Swapnil S

मुंबई : वीजनिर्मिती क्षेत्रातील टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड या दोन कंपन्या राज्यात अणुवीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही कंपन्यांकडून ४ हजार २०० मेगावॅट क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी ७९ हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आला.

राज्याची स्वच्छ ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जेच्या वापरात राज्याने लक्षणीय प्रगती केली आहे. अणुऊर्जा हा सक्षम आणि महत्त्वाचा पर्याय म्हणून पुढे आला आहे. या नवीन ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीमुळे अणुऊर्जेच्या निर्मिती क्षमतेत मोठी वाढ शक्य होईल, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

अणुऊर्जा क्षेत्रात नव्या संधी

देशात विकसित करण्यात आलेल्या स्वदेशी अणुभट्ट्या तसेच थोरियम आधारित तंत्रज्ञानाच्या चाचण्यांमुळे अणुऊर्जा क्षेत्रात नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. हे क्षेत्र उदयोन्मुख असून या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांच्या प्रवासात राज्य सरकार सहप्रवासी म्हणून पूर्ण सहकार्य करेल. टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड सोबत झालेल्या या दोन करारांमुळे महाराष्ट्राच्या अणुऊर्जा निर्मिती क्षमतेला आणखी बळ मिळणार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेडचे अभिनंदन केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

विकास प्रकल्पांना गती; 'महाराष्ट्र लँड बँक', 'महाभूमी स्टॅक' प्रणालीचे महसूलमंत्री बावनकुळेंच्या हस्ते लोकार्पण

पालघर रुग्णालय हल्ला प्रकरण : पोलिसांच्या कारभारावर हायकोर्टाचे ताशेरे

अंधेरी, गोरेगावातील अतिक्रमण हटवले; अकराशे मीटर लांब फुटपाथवरील बेकायदा बांधकामांवर हातोडा; स्टॉल, बेकायदा बांधकामे, वाढीव शेड केले जमीनदोस्त

आकड्यांच्या पलीकडे तथ्याचे आकलन

तब्बल १८ अब्ज डॉलर्सचा समझोता