Maharashtra SSC Result 2026 : दहावीचा निकाल जाहीर; 'या' वेबसाइट्सवरून लगेच पाहा मार्कशीट 
महाराष्ट्र

Maharashtra SSC Result 2026 : दहावीचा निकाल जाहीर; 'या' वेबसाइट्सवरून लगेच पाहा मार्कशीट

गुणपत्रिकेत कोणतीही चूक किंवा माहितीमध्ये विसंगती आढळल्यास विद्यार्थ्यांनी तातडीने संबंधित शाळेशी संपर्क साधावा, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

किशोरी घायवट-उबाळे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) पत्रकार परिषदेत आज (दि.८) महाराष्ट्र एसएससी निकाल २०२६ जाहीर केला असून निकालाची लिंक आता सक्रिय करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना सकाळी ११.३० वाजल्यापासून अधिकृत संकेतस्थळावर रोल नंबर किंवा सीट नंबर आणि आईचे पहिले नाव टाकून निकाल पाहता येत आहे. विद्यार्थी एसएमएस आणि डिजीलॉकरद्वारेही निकाल पाहू शकतात. महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान घेण्यात आली होती.

दहावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे

ऑनलाइन निकाल कसा पाहाल?

स्टेप १: mahahsscboard.in आणि sscresult.mahahsscboard.in या संकेतस्थळांना भेट द्या.

स्टेप २: महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल २०२६ लिंकवर क्लिक करा.

स्टेप ३: रोल नंबर आणि आईचे पहिले नाव टाका.

स्टेप ४: महाराष्ट्र बोर्डाचा एसएससी २०२६ निकाल स्क्रीनवर दिसेल.

स्टेप ५: निकाल डाउनलोड करून सेव्ह करा.

गुणपत्रिकेतील 'या' गोष्टी तपासा

निकाल डाउनलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेतील सर्व माहिती काळजीपूर्वक तपासावी.

  • विद्यार्थ्याचे नाव तपासा.

  • पालकांची नावे योग्य आहेत का ते पाहा.

  • शाळेचे नाव तपासा.

  • रोल नंबर योग्य आहे का त्याची खात्री करा.

  • श्रेणी किंवा पास/नापास स्थिती तपासा.

  • विषयानुसार मिळालेले गुण तपासा.

चूक आढळल्यास तातडीने शाळेला संपर्क करा

गुणपत्रिकेत कोणतीही चूक किंवा माहितीमध्ये विसंगती आढळल्यास विद्यार्थ्यांनी तातडीने संबंधित शाळेशी संपर्क साधावा, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के

महाराष्ट्र एसएससी निकाल २०२६ मध्ये राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. राज्यात एकूण १७९ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवत विशेष कामगिरी केली आहे.

विभागनिहाय १०० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी

  • मुंबई - ५ विद्यार्थी

  • पुणे - १२ विद्यार्थी

  • नागपूर - ३ विद्यार्थी

  • छत्रपती संभाजीनगर - २४ विद्यार्थी

  • कोल्हापूर - १५ विद्यार्थी

  • अमरावती - ३ विद्यार्थी

  • नाशिक - ६ विद्यार्थी

  • लातूर - ७ विद्यार्थी

मुंबई विभागाची आकडेवारी

ग्रेटर मुंबई

  • नोंदणीकृत विद्यार्थी : २७,६५०

  • परीक्षेला बसलेले विद्यार्थी : २७,२७५

  • उत्तीर्ण विद्यार्थी : २५,४२१

  • एकूण निकाल : ९३.२० टक्के

  • मुलांचा निकाल : ९१.३५ टक्के

  • मुलींचा निकाल : ९५.१९ टक्के

मुंबई (उपनगर १)

  • नोंदणीकृत विद्यार्थी : ५४,४५२

  • परीक्षेला बसलेले विद्यार्थी : ५४,०३७

  • उत्तीर्ण विद्यार्थी : ५०,९६८

  • एकूण निकाल : ९४.३२ टक्के

  • मुलांचा निकाल : ९२.९२ टक्के

  • मुलींचा निकाल : ९५.८० टक्के

मुंबई (उपनगर २)

  • नोंदणीकृत विद्यार्थी : ४५,२९४

  • परीक्षेला बसलेले विद्यार्थी : ४४,७४१

  • उत्तीर्ण विद्यार्थी : ४१,०५४

  • एकूण निकाल : ९१.७५ टक्के

  • मुलांचा निकाल : ८९.४१ टक्के

  • मुलींचा निकाल : ९४.३२ टक्के

एकूण मुंबई विभाग

  • उत्तीर्ण विद्यार्थी : ३,२२,०७७

  • एकूण निकाल : ९२.८४ टक्के

  • मुलांचा निकाल : ९०.९३ टक्के

  • मुलींचा निकाल : ९४.९४ टक्के

विद्यार्थ्यांची आकडेवारी

महाराष्ट्र बोर्डाने दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान राज्यातील ५,१११ परीक्षा केंद्रांवर घेतली होती. यंदा परीक्षेसाठी एकूण १६,१५,४८९ विद्यार्थी बसले होते. यामध्ये ८,६५,७४० मुले, ७,४९,७३६ मुली, १३ ट्रान्सजेंडर विद्यार्थी यांचा समावेश होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा नोंदणीमध्ये ३,८७९ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. याशिवाय, राज्यभरातून २३,६८३ विद्यार्थ्यांची स्वतंत्र नोंदणी करण्यात आली होती.

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार