महाराष्ट्र

तुमच्या आमदारामुळे राज्य नासतेय! बारामतीत वैभवी देशमुखचा एल्गार

तुमच्या आमदारामुळे राज्य नासत चालले आहे, त्याला पाठीशी घालू नका, आम्हाला न्याय द्या, अशी मागणी दिवंगत सरपंच संतोष देशमुखा यांची मुलगी वैभवी देशमुख हिने केली.

Swapnil S

बारामती : तुमच्या आमदारामुळे राज्य नासत चालले आहे, त्याला पाठीशी घालू नका, आम्हाला न्याय द्या, अशी मागणी दिवंगत सरपंच संतोष देशमुखा यांची मुलगी वैभवी देशमुख हिने केली. त्यांच्यासारख्या लोकांमुळे आमच्यासारख्यांचे जगणं मुश्कील झाले आहे. ज्या खंडणीसाठी माझ्या वडिलांचा जीव गेला ती कुणासाठी मागितली जात होती? माझ्या वडिलांचा गुन्हा काय होता? असे प्रश्नही तिने विचारले.

बारामतीत मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीयही सहभागी झाले होते. यावेळी बोलताना संतोष देशमुखांची मुलगी वैभवीला अश्रू अनावर झाले.

अजित पवारांना विनंती आहे की, माझे वडील गेलेत आम्ही न्याय मागतोय. आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. या प्रकरणाची खोलवर जाऊन चौकशी करा. तुमच्या पक्षातील एक जे आमदार आहेत, त्यांच्यामुळे हे राज्य नासत चालले आहे. त्याला तुम्ही पाठीशी घालू नका. याआधीही अनेक प्रकरणे घडली आहेत. त्याचीही चौकशी करा, अशी मागणी तिने केली.

ज्या खंडणीसाठी माझ्या वडिलांचा जीव गेला ती नेमकी कुणाला जात होती? त्यामध्ये माझ्या वडिलांचा गुन्हा काय होता? सरकारचे डोळे कधी उघडणार? असे सवाल तिने उपस्थित केले आहेत. दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येसंदर्भातले सर्व लेखी पुरावे लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी जाहीर केले.

वैभवी देशमुख म्हणाली की, एका दलित व्यक्तीला वाचवायला गेले तरी माझ्या वडिलांना अमानुष मारहाण झाली. एखाद्याला मदत करणे गुन्हा आहे का? मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होता. मला चेहरा बघायला मिळाला नाही. इथून पुढे कधी चेहरा बघायला मिळणार नाही.

वैभवी देशमुख म्हणाली की, आता आम्हाला जर न्याय मिळाला नाही, तर रस्त्याने चालताना धक्का लागला तरी हे आम्हाला जीवे मारतील. त्यामुळे न्याय मिळाला पाहिजे. प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा हीच विनंती, अशी मागणी तिने केली.

Traffic Challan : ई-चलन भरलं नाही तर वीज बिलात जोडणार दंडाची रक्कम? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा इशारा

२ हजारांवरील UPI पेमेंट शुल्काला स्थगिती देण्यास SC चा नकार; केंद्रासह RBI लाही नोटीस

मोठी बातमी! CJP च्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी नाकारली परवानगी; अभिजीत दिपकेंकडून २ ऑक्टोबरला 'जेल भरो'ची घोषणा

आई धावत मागे आली, पण क्षणात होत्याचं नव्हतं! स्कॉर्पिओने ३ वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

UMANG App : पीएफच्या कामासाठी आता EPFO ऑफिसच्या फेऱ्या नको! घरबसल्या करता येतील ही १० महत्त्वाची कामं