राज्यातील नागरिकांना घराजवळच दर्जेदार आरोग्य सेवा; स्वातंत्र्यदिनी राज्यातील आरोग्य संस्थांचे लोकार्पण 
महाराष्ट्र

राज्यातील नागरिकांना घराजवळच दर्जेदार आरोग्य सेवा; स्वातंत्र्यदिनी राज्यातील आरोग्य संस्थांचे लोकार्पण

दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासह राज्यातील नागरिकांना घराजवळच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ८० टक्क्यांहून अधिक बांधकामे पूर्ण झालेल्या आरोग्य संस्था नागरिकांच्या सेवेत दाखल होणार असून स्वातंत्र्यदिनी राज्यातील आरोग्य संस्थांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासह राज्यातील नागरिकांना घराजवळच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ८० टक्क्यांहून अधिक बांधकामे पूर्ण झालेल्या आरोग्य संस्था नागरिकांच्या सेवेत दाखल होणार असून स्वातंत्र्यदिनी राज्यातील आरोग्य संस्थांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

राज्यातील उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ट्रॉमा केअर युनिट, स्त्री रुग्णालय अशा विविध आरोग्य सुविधा नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहेत. राज्यातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार व तातडीच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.

जत, घनसावंगी, अंबड, बदलापूर खर्डी, मोखाडा, डहाणू, सांगोला, कोंढाळ, ब्रह्मपुरी, वाडी (बु.), वाशीम, धुळे इत्यादी ठिकाणांवरील आरोग्य संस्था उद्घाटनासाठी सज्ज आहेत तसेच चंद्रपूर, धुळे, पुणे, जळगाव, बीड, छत्रपती संभाजीनगर, वाशीम, बुलढाणा आणि सोलापूर येथील विविध आरोग्य प्रकल्पही नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहेत. या प्रकल्पांमध्ये आधुनिक ट्रॉमा केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालय आणि प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि ब्लॉक सार्वजनिक आरोग्य युनिट्सची कामेही पूर्णत्वाला आली आहेत. नागपूर, गडचिरोली, सांगली, सिंधुदुर्ग, नांदेड आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये नवीन आरोग्य सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

आरोग्य संवाद यात्रेचे लवकरच लोकार्पण

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने आरोग्य सेवा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. अनेक वर्षे विविध कारणांनी रखडलेली होती. ज्या आरोग्य संस्थांची ८० टक्क्यांहून अधिक बांधकामे झाली आहेत त्यांना प्राधान्याने पूर्णत्वाला नेण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्या सर्व संस्था आधुनिक सुविधांसह नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहेत. पूर्णत्वाला येत असलेल्या उर्वरित आरोग्य संस्थांचेही 'आरोग्य संवाद' यात्रेदरम्यान लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे.

गुणवत्तापूर्ण वेळेवर उपचार

८० टक्के बांधकाम पूर्ण झालेल्या आरोग्य संस्था नागरिकांच्या सेवेत उपलब्ध झाल्यानंतर ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. अपघातग्रस्त, हृदयरुग्ण, माता-बालक तसेच आपत्कालीन रुग्णांना स्थानिक स्तरावरच अधिक गुणवत्तापूर्ण आणि वेळेवर उपचार मिळणार आहेत. याचबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांनाही अधिक सुसज्ज कार्यपरिसर उपलब्ध होणार आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कचरा फेकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा! रस्त्यात थुंकणे, घाण करणाऱ्या ४ हजारांहून अधिक जणांवर कारवाई, ७०.०१ लाखांचा दंड वसूल

मुंबईतील पदपथ अतिक्रमणमुक्त करा! अश्विनी भिडे यांचे सहाय्यक आयुक्तांना निर्देश

SRA सदनिकेचा बेकायदेशीर ताबा सिद्ध करण्यासाठी विक्री कराराची गरज नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

अनिल अंबानी यांच्याविरोधात CBI ने दाखल केला गुन्हा; १,८१६ कोटींचा ईपीएफओ गुंतवणूक गैरव्यवहार

मुंबई-सावंतवाडी दरम्यान नवीन एक्स्प्रेस धावणार; चाकरमानी, पर्यटकांची मोठी सोय होणार