माणगाव बायपाससाठी मेगाब्लॉक; मुंबई-गोवा मार्गाच्या कामाला गती, चार उड्डाणपुलांची कामे ३१ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

माणगाव बायपाससाठी मेगाब्लॉक; मुंबई-गोवा मार्गाच्या कामाला गती, चार उड्डाणपुलांची कामे ३१ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी सार्वजिनक बांधकाम विभागाने मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.

Swapnil S

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी सार्वजिनक बांधकाम विभागाने मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. आता  महामार्गाच्या कामाचा सतत आढावा घेऊ नका तर प्रत्यक्ष काम पूर्ण करा, असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले आहेत. कोलेटी, संगमेश्वर, निवळी, लांजा या चार उड्डाणपुलांची कामे ३१ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्यास सांगण्यात आले असून माणगाव बाह्यवळण मार्गात रेल्वे पुलाचे गर्डर टाकण्यासाठी २० ऑगस्टपासून कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम संथगतीने सुरु असल्याने यंदाही कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास रडतखडत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भावना लक्षात घेत मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या रस्त्याची पाहणी केली होती. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरूवारी    बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची    बैठक घेऊन हा महामार्ग गणेशोत्सवाआधी सुकर करण्याचे आदेश दिले. तसेच ३१ ऑगस्टआधी कोलेटी, संगमेश्वर, निवळी, लांजा या उड्डाणपुलांची कामे पूर्ण करण्याची सूचनाही शिवेंद्रसिंहराजे यांनी दिल्या.

मेगाब्लॉक घेऊन गर्डर टाकण्याचे काम

माणगाव बाह्यवळण मार्गावरील एकमार्गी वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. साडेसात किमी लांबीच्या मार्गापैकी साडेपाच किमीचा मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करणे शक्य होणार आहे. त्याच्या पुढील टप्प्यासाठी २० ऑगस्टपासून मेगाब्लॉक घेऊन रेल्वेपुलावरील गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. गर्डर टाकून पूर्ण होताच पुढील कामेही वेगाने पूर्ण करून उर्वरित दोन किमीचा मार्गही एकमार्गी वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल.

चिपळूणच्या कामाला वेग

चिपळूण येथील सर्वात मोठा उड्डाणपूल पूर्ण करण्याचे कामही वेगाने केले जात आहे. या उड्डाणपुलावरील गर्डर टाकण्याचे काम संपुष्टात आले असून प्रांत कार्यालयाजवळ भरावाचे कामही पूर्ण केले जाणार आहे. मात्र, हा पूल गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणे अवघड असल्याचे बांधकाम विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबईत उद्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल; सांस्कृतिक कार्यक्रम, मानवी साखळी, कार्यशाळेचे आयोजन

Mumbai : १११ क्र.बसच्या अनियमित फेऱ्यांमुळे प्रवासी त्रस्त

Solapur : पुढचे आंदोलन थेट ‘वर्षा’वर; मनोज जरांगेंचा इशारा

Mumbai : मृतांचा आकडा आठवर! घाटकोपर दरड दुर्घटनेत तब्बल ३० तासांची शोधमोहीम संपली; मोठ्या दगडांचा बचावकार्यात अडथळा

Pune : मोशी कचरा डेपो दुर्घटना; पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची आत्महत्या, दोन चिमुकल्या मुली पोरक्या