महाराष्ट्र

''कधी शेतीवर या महाराज...'' विधानसभेत कृषिमंत्री 'रम्मी'मध्ये मग्न; रोहित पवारांनी व्हिडीओ केला पोस्ट

राज्यात एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी, पीकविमा आणि हमीभावांसारखे प्रश्न गंभीर बनले असताना, दुसरीकडे विधानसभेच्या सत्रात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मोबाइलवर 'रम्मी' गेम खेळताना दिसल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नेहा जाधव - तांबे

राज्यात एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी, पीकविमा आणि हमीभावांसारखे प्रश्न गंभीर बनले असताना, दुसरीकडे विधानसभेच्या सत्रात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मोबाइलवर 'रम्मी' गेम खेळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ  राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी X वर शेअर करत कृषीमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

"कभी गरीब किसानो की खेती पर भी आओ ना महाराज!" - रोहित पवारांचा टोला

रोहित पवार यांनी व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं की,

“#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!” सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का?

#कधी_शेतीवर_या_महाराज

#खेळ_थांबा_कर्जमाफी_द्या

शेतकऱ्यांनो विसरा हमी... खेळा रम्मी -

रोहित पवारांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर खासदार सुप्रिया सुळे यांनी "कठीण आहे!" अशी प्रतिक्रिया दिली. तर जितेंद्र आव्हाड यांनी "शेतकऱ्यांनो विसरा हमी... खेळा रम्मी!" अशा उपरोधिक कॅप्शनसह कोकाटेंचा ‘रम्मीमास्टर कृषिमंत्री’ म्हणून फोटो पोस्ट केला.

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्यातील बहुतांश जिल्ह्यात २५ जुलैपर्यंत जोरदार पाऊस

राज्यात पोलिसांविरोधातील तक्रारींमध्ये वाढ; सहा महिन्यांत ४८७ तक्रारी, केवळ ४५ प्रकरणांचा निकाल

...तर वाहनचालकांचे फास्टॅग जाणार काळ्या यादीत; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा नवा नियम लागू

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून; विविध मुद्द्यांवर सरकारची चर्चेची तयारी

रोहित पवारांविरोधात ‘एफआयआर’ दाखल; सरकारी कामकाजात अडथळा, पोलिसांशी गैरवर्तनाचा आरोप