माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडे यांनीच रचला! धनंजय मुंडे - जरांगे यांच्यात जुंपली 
महाराष्ट्र

माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडे यांनीच रचला! धनंजय मुंडे - जरांगे यांच्यात जुंपली

राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी शुक्रवारी येथे केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी शुक्रवारी येथे केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची बाब समोर आल्यानंतर आपण शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत सविस्त माहिती देणार असल्याचे जरांगे यांनी गुरुवारी जाहीर केले होते. त्यानुसार जरांगे यांनी पत्रकार परिषदेत मुंडे यांच्यावर हा गंभीर आरोप केले.

जरांगे-पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांची चौकशी करावी. कारण आरोपींसोबत त्यांच्या बैठका झाल्या आहेत. धनंजय मुंडे यांनी खून करण्याचा आणि घातपात करण्याचा कट रचला आहे. बीड आणि जालना जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठित नेत्यांनी ही गोष्ट त्यांच्या कानाने ऐकली आहे. त्यामुळे तुम्ही पक्षातील लोकांना विचारून घ्या की जरांगे पाटील सांगत होते ते खरे आहे का, मला ही गोष्ट कळली आहे. त्यानंतर याबाबतची माहिती मी पोलीस प्रशासनाला दिली. कारण मुख्य सूत्रधारच धनंजय मुंडे आहेत. ज्यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना सरकारने संरक्षण देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

कॉल रेकॉर्डिंग आणि मुंडेंचा कांचनसोबतचा फोटो व्हायरल

धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंडेंवर आरोप करताना पत्रकार परिषदेमध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीची आणि धनंजय मुंडेंची कॉल रेकॉर्डिंग ऐकवली. यामुळे खळबळ उडाली आहे. आता त्यानंतर धनंजय मुंडे यांचा एका फोटो व्हायरल होतोय, त्यात मुंडे कांचन साळवीसोबत असल्याचे दिसत आहेत. आपल्यावर गोळ्या झाडण्यापासून ते गाडीने अपघात घडवण्यापर्यंतचा कट रचला जात असल्याचा खळबळजनक आरोप जरांगेंनी केला. आपल्याकडे धनंजय मुंडे यांचे कथित कॉल रेकॉर्डिंग, मेसेज आणि इतर पुरावे असल्याचंही जरांगे पाटील म्हणालेत

जरांगेंनी क्लिप ऐकवल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्याला उत्तरही दिले. आर्टिफिशल इंटेलिजन्सने आज काहीही तयार करता येते. म्हणे माझे फोनवर बोलणे झाले, माझा फोन २४ तास सुरू असतो, गोरगरीब लोक मला फोन करतात, माझे फोनवर बोलणे झाले असेल, पण तुम्हाला संपवण्याच्या उद्देशाने बोललो नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले. पणा आता कांचन साळवीसोबतच्या फोटोमुळे पुन्हा नव्या चर्चांना उधाण आले आहे.

जरांगे यांना संपवण्याचा कट रचण्यात आला आणि यामध्ये धनंजय मुंडे सहभागी असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. यावेळी त्यांनी अमोल खुणे, दादा गरुड यांच्यासह आणखी एका व्यक्तीचे नाव घेतले. हा बीडमधील असून तो धनंजय मुंडेंचा पीए किंवा कार्यकर्ता असावा असा अंदाज आहे, त्याचे नाव कांचन साळवी आहे. धनंजय मुंडेसोबतचे काही फोटो आता सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहेत.

जीवावर उठणे गंभीर

धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करताना जरांगे पुढे म्हणाले की, मराठा समाजाने शांत राहावे. माझ्या गाडीचा अपघात करत मला ठार मारण्याचा प्रयत्न होता. बीडचा कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे. त्यांनीच माझ्या विरोधात हे षडयंत्र रचण्याचे काम केले आहे. मराठा समाजाच्या नेत्यांनी हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. अशा वृत्तीचा आपल्याला नायनाट करावा लागेल. आरक्षण, राजकारण हा विषय वेगळा आहे. पण जीवावर उठणे हा विषय खूप गंभीर आहे.

माझी आणि जरांगे यांची एकदा नार्को टेस्ट करा - मुंडे

परळी : मनोज जरांगे-पाटील यांनी केलेले सर्व आरोप धनंजय मुंडेंनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन फेटाळून लावले. ते म्हणाले की, आमच्या दोघांच्याही ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा. इतकेच नव्हे तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

यावेळी मुंडे म्हणाले, जरांगे-पाटील ऑन एअर म्हणतात, मला संपवून टाकतील. या विधानानंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. गेली ३० वर्षे मी सामाजिक आणि राजकीय जीवनात आहे. स्व. गोपीनाथ मुंडे आणि अण्णांनी जातपात पाहायची नाही, असे शिकवले. मी आजवर कधीही जात पाहून काम केले नाही. माझे जीवन आणि मरण हे गरीबातील गरीब माणसाला मोठे करण्यासाठी आहे. जरांगें आता मर्यादा ओलांडत आहेत. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. याशिवाय, माझी आणि जरांगेंची ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करावी, असेही मुंडें म्हणाले.

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार