महाराष्ट्र

अर्धनग्न, मुंडन करत आंदोलनकर्त्यांचा निषेध; डुप्लिकेट जरांगे-पाटील आले चर्चेत

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हजारोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत डेरेदाखल झाले असून यात मनोज जरांगे-पाटील यांचा डुप्लिकेट जरांगे आंदोलनात चर्चेत आले आहे.

Swapnil S

मुंबई : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हजारोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत डेरेदाखल झाले असून यात मनोज जरांगे-पाटील यांचा डुप्लिकेट जरांगे आंदोलनात चर्चेत आले आहे.

आंदोलनात काही सोयीसुविधा नसल्याने आंदोलकांनी अर्धनग्न व केस मुंडन करत सरकारचा निषेध केला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे-पाटील यांनी मुंबईकडे कूच करत थेट आझाद मैदान गाठले. अर्थात राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली. मात्र आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, अशी ठाम भूमिका पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारची अडचण झाली असून आंदोलकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र आझाद मैदान परिसरात शौचालय, खाऊची दुकान बंद असा आरोप आंदोलकांसह मविआच्या नेत्यांनी केला. त्यानंतर तातडीने मुंबई महापालिका प्रशासनाकडून सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी मुंडन केले.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या