मराठा आंदोलक  छाया सौ : विजय गोहिल
महाराष्ट्र

पुण्याहून आझाद मैदानाकडे निघालेल्या मराठा बांधवांवर पनवेलमध्ये किरकोळ कारणावरून हल्ला; ५ जण जखमी, दोघांना अटक

Maratha Reservation : मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुण्याहून पिकअप टेम्पो घेऊन मुंबईत जाणाऱ्या मराठा बांधवांना ८ ते १० जणांनी किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना

Swapnil S

नवी मुंबई : मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुण्याहून पिकअप टेम्पो घेऊन मुंबईत जाणाऱ्या मराठा बांधवांना ८ ते १० जणांनी किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी पनवेलमध्ये घडली. या मारहाणीत ५ मराठा बांधव जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी मराठा बांधवांना मारहाण करणाऱ्या ८ ते १० जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यापैकी पाच आरोपींना अटक केली आहे. तसेच इतर मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे शुक्रवारपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील मराठा बांधव मुंबईत दाखल होत आहेत. रविवारी दुपारी पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील काही मराठा बांधव पिकअप वाहनाने जुन्या मुंबई–पुणे मुंबई रोडने मुंबईच्या दिशेने जात होते. मराठा बांधवाची पीकअप सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास पनवेल मधील डेरवली ब्रिजच्या जवळ आली असताना, रहदारीच्या ओघात पुढे चालत असलेल्या लाल रंगाच्या कारला (क. एम एच ४६ बीए २०३२) पीकअप वाहन घासली गेली.

यावरून कार चालक आणि मराठा बांधवांमध्ये वाद होऊन भांडण झाले, त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली. या गोष्टीचा राग मनात राग धरून कार चालकाने पुष्पक नगर समोरील पहिल्या ब्रिजजवळ मराठा बांधवांचे पीकअप वाहन अडवले. त्यानंतर आरोपी कार चालक व त्याच्या ८ ते १० साथीदारांनी चंद्रकांत बाबाजी थोरांधळे, शाम बबन केमगीरे, गणेश ज्ञानेश्वर मिंडे, रामदास पिंगळे, सुधाकर ढवळे या मराठा बांधवांना शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली. या घटनेनंतर सर्व हल्लेखोरांनी पलायन केले.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Navi Mumbai : महापालिका पदभरती निकालाचा मार्ग मोकळा; संवर्गाचे स्कोअर कार्ड संकेतस्थळावर होणार जाहीर

Thane : खारफुटीतील भराव तात्काळ थांबवा! पोलीस आयुक्तांना NGT चा दणका, जिल्हाधिकाऱ्यांनाही फटकारले

Ulhasnagar : 'मी आमदार आहे, नगरसेवकाला विचारण्याची गरज नाही'; गोलमैदानातील विकासकामावरून आयलानी-पांडे आमनेसामने

Thane : गणेशोत्सवात अवजड वाहनांना 'नो एंट्री' विसर्जनाच्या पाच दिवसांत शहरात प्रवेशबंदी