महाराष्ट्र

पक्षप्रवेशाआधी मिलिंद देवरा सिद्धिविनायक चरणी; बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊनही घेतला आशीर्वाद

"महाराष्ट्रासाठी बाळासाहेबांनी केलेले कार्य हे शब्दात मांडणे कठीण आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनात त्यांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या स्मृतीस नमन करून आपल्या राज्यातील प्रत्येक माणसासाठी काम करण्याचा वसा मी आज घेतला, असे देवरा म्हणाले.

Rakesh Mali

काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर माजी खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत(शिंदे गटात) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी देवरा यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन आशीर्वाद घेतला.

"माझ्या आयुष्यातील नवीन वळणाची सुरुवात मी श्री सिद्धिविनायक मंदिरात, श्री गणपतीचे दर्शन घेऊन केली. बाप्पाच्या आशीर्वादाने मला एक नवीन उमेद मिळाली. मुंबई आणि देशासाठी नवचैतन्याने काम करण्याची प्रेरणा मिळाली", अशी भावना देवरा यांनी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत सिद्धिविनायक न्यास मंदिराचे अध्यक्ष असलेले शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर हे देखील होते.

यानंतर देवरा यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. "महाराष्ट्रासाठी बाळासाहेबांनी केलेले कार्य हे शब्दात मांडणे कठीण आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनात त्यांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या स्मृतीस नमन करून आपल्या राज्यातील प्रत्येक माणसासाठी काम करण्याचा वसा मी आज घेतला, असे देवरा म्हणाले.

दरम्यान, मिलिंद देवरा हे दोन वेळा दक्षिण मुंबई मतदार संघातून काँग्रेकडून खासदार होते. मागील दोन निवडणुकीत शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला होता. सावंत हे दक्षिण मुंबई मधून विद्यमान खासदार असल्याने आणि ते उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याने ठाकरे गट या जागेसाठी आग्रही आहे. त्यामुळे देवरा हे नाराज असून शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सूरू होत्या. अखेर आज देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी