महाराष्ट्र

Pune : मनसेच्या जिल्हाध्यक्षावर कुटुंबासमोरच गोळीबार; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

काही गुंडांनी खंडणी प्रकरणी पुण्यातील (Pune) मनसेच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार केल्याने परिसरात खळबळ उडाली

प्रतिनिधी

पुण्यातील (Pune) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) जिल्हाध्यक्ष समीर थिगळे (Sameer Thigale) यांच्यावर काही गुंडांकडून गोळीबार करण्यात आला. राजगुरुनगरच्या सातकरस्थळमधील राहत्या घरासमोर हा धक्कादायक प्रकार घडला. सुदैवाने,या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली असून परिसरात एकच खळबळ उडाली. गुंडानी समीर थिगले यांच्या कुटुंबीयांसमोरच गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला. दरम्यान, पोलिसांनी यासंदर्भात २ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

कुख्यात गुंडांनी खंडणीसाठी समीर थिगळे त्यांच्याकडे मागणी केली. यावेळी, "मी खेडचा भाई, एकाला घालवलंय, आता तुलाही माज आला आहे, संपवतोच तुला" असे म्हणत एकाने त्यांच्यावर बंदूक रोखली होती. मात्र, गोळी बंदुकीतून न सुटल्याने त्यांचा जीव थोडक्यात वाचला. दरम्यान, त्याआधी त्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केला. समिती यांच्या कुटुंबासमोर त्यांना धमकावले आणि घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरुनगर पोलिस ठाण्यात मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले. हे दोघेही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हे गुंड मोक्कातील आरोपी असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत