धाराशिव : नळदुर्ग किल्ल्यावरून आईची तीन मुलांसह उडी 
महाराष्ट्र

धाराशिव : नळदुर्ग किल्ल्यावरून आईची तीन मुलांसह उडी

काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून खाली कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ताजी असतानाच, आता धाराशिवमधूनही तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Swapnil S

धाराशिव : काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून खाली कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ताजी असतानाच, आता धाराशिवमधूनही तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यावरून एका आईने आपल्या तीन लहान मुलांसह उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण घटनेत आई आणि तिच्या एका मुलाचा मृत्यू झाला असून, दोन चिमुकल्या मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगरमधील तीसगाव परिसरात असलेल्या खवड्या डोंगरावर काही दिवसांपूर्वी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली होती. आत्मघाती पाऊल उचलण्याच्या उद्देशाने डोंगरावर गेलेल्या १८ वर्षीय मुलाला वाचवण्यासाठी त्याचे आई-वडील धावले होते. मात्र, मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडीलही त्याच्यासोबत खाली कोसळले. मुलगा आणि पती डोळ्यांसमोर दरीत पडल्याचा धक्का सहन न झाल्याने आईनेही डोंगरावरून उडी घेतल्याचे समोर आले होते. या घटनेत कुणाल मुरलीधर चांदवडे, मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे या तिघांचा मृत्यू झाला होता.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

२०२९ पर्यंत राज्यातच! दिल्लीला जाण्याच्या चर्चांना फडणवीसांचा पूर्णविराम; माझे नेते, पक्ष ठरवेल त्या दिवशी मात्र मी जरूर दिल्लीला जाईन...

Mumbai : बिल्डर, आर्किटेक्टवर पालिकेची होणार कारवाई; हवा प्रदूषणाबाबतचे नियम अधिक कडक

Mumbai : अतिक्रमणांवर बुलडोझर; मुलुंड, मोहम्मद अली रोडवर पालिकेची धडक

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा सूर मंदावला; पीओपी मूर्ती, रासायनिक रंग आणि खर्चाचा परिणाम, उत्सवाला ग्रहण झगमगाटाचे

Pune : विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला, आरोपी ताब्यात; डीजेविरुद्ध आवाज उठवण्यावरून मारहाण, मुख्यमंत्र्यांकडूनही निषेध