MPSC कडून भरती प्रक्रिया रद्द; भाषा उपसंचालक पदाची जाहिरात मागे 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

MPSC कडून भरती प्रक्रिया रद्द; भाषा उपसंचालक पदाची जाहिरात मागे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाची परीक्षा रद्द केल्यानंतर आता आणखी एका भरती प्रक्रियेला स्थगिती देत संबंधित जाहिरात मागे घेतली आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाची परीक्षा रद्द केल्यानंतर आता आणखी एका भरती प्रक्रियेला स्थगिती देत संबंधित जाहिरात मागे घेतली आहे.

आयोगाच्या अधिकृत प्रसिद्धिपत्रकानुसार, भाषा संचालनालयातील भाषा उपसंचालक (भाषांतर व परिभाषा), गट-ब या पदासाठीची जाहिरात रद्द केली. भरती नियमांमध्ये सुधारणा करण्याबाबत राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने दिलेल्या स्पष्ट निर्देशांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना योमर्यादेत सवलत देणे, या बाबींचा समावेश आहे.

एमपीएससीच्या परीक्षा आणि भरती प्रक्रियांबाबत अलीकडच्या काळात घडामोडींना वेग आला आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या गंभीर आरोपांनंतर आयोगाने यापूर्वी औषध निरीक्षक पदाची भरती परीक्षा रद्द केली होती. याशिवाय, अन्य महत्त्वाच्या परीक्षांबाबतही सध्या चौकशी सुरू आहे. या चौकशीत गैरप्रकार सिद्ध झाल्यास संबंधित परीक्षाही रद्द होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांपेक्षा वेगळे असलेले भाषा उपसंचालक पदाच्या भरतीचे हे प्रकरण प्रशासकीय कारणांमुळे उद्भवले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी शांततेत मतदान; निकाल २७ ऑक्टोबरला

एमपीएससी पेपरफुटी प्रकरण: आयोगाच्या अधिकाऱ्याला अटक; मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Mumbai : सीएसएमटी भुयारी मार्ग प्रदूषणाच्या विळख्यात; BMC मुख्यालयाजवळच अनधिकृत विक्रेत्यांचे बस्तान

किशन जायबंदी, वैभवला संधी? भारत-न्यूझीलंड यांच्यात आज दुसरा सामना; गोलंदाजांची पुन्हा कसोटी