महाराष्ट्र

Mumbai Mira Road Tension: पोलिसांचे सर्व ग्रुप अ‍ॅडमिन्सना निर्देश, आदेशाचे उल्लंघन केल्यास होईल कारवाई

Rakesh Mali

प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने निघालेल्या मिरवणूकीवर मीरा रोडच्या नयानगर परिसरात काही समजाकंटकांनी रविवारी रात्री हल्ला केला होता. या घटनेचे अनेक व्हिडिओ-फोटो-पोस्ट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याची मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी दखल घेतली आहे. जातीय सलोखा राखण्यासाठी सोशल मीडियावर या घटनेशी संबंधित कोणतेही फोटो, जोक्स, पोस्ट किंवा व्हिडिओ फॉरवर्ड करू नयेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास ग्रुप अ‍ॅडमिनवर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मीरारोडच्या नयानगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर मंगळवारी पालिकेने बुलडोझर कारवाई सुरू केली. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालिकेनेही ही नियमित कारवाई असल्याचे सांगितले आहे; मात्र सोमवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दंगल करणाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणार असल्याचे संकेत दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

मीरारोडच्या नयानगर परिसरात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यासंदर्भात अशा प्रवृत्तींच्या लोकांवर कारवाई केली जाईल, त्यांची अतिक्रमणे पाडण्यात येतील, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मंगळवारी सकाळपासूनच पालिकेने कारवाईची तयारी केली होती. संध्याकाळी 5 च्या सुमारास प्रचंड पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू करण्यात आली. ही नियमित कारवाई असल्याचे उपायुक्त मारुती गायकवाड यांनी सांगितले; मात्र रविवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवरच ही कारवाई होत असल्याची चर्चा आहे. आमच्याकडे पालिकेने बंदोबस्त मागितला होता. तो आम्ही दिला, असे पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) जयंत बजबळे यांनी सांगितले.

व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याला अटक-

भगवे झेंडे फडकावत आणि ‘जय श्रीराम’चा नारा देणाऱ्या हिंदू समाजावर मुस्लीम समुदायाच्या लोकांनी कथित हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अबू शेख याला मीरा-भाईंदर पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस