पोलीस पथकातील श्वानांची तगमग थांबणार; निवृत्तीनंतरही पोलीस दलातच राहणार, मुख्यमंत्र्यांचा निर्णय 
महाराष्ट्र

पोलीस पथकातील श्वानांची तगमग थांबणार; निवृत्तीनंतरही पोलीस दलातच राहणार, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

श्वान पथक म्हणजे पोलीस दलाचा महत्त्वाचा घटक असून गुन्ह्यांचा तपास किंवा स्फोटक शोध व बचाव मोहिमांत श्वान सगळ्यात पुढे असतो. पण १० वर्षांनंतर निवृत्त होताच या श्वानाला पोलीस दल सोडावे लागते.

Swapnil S

मुंबई : श्वान पथक म्हणजे पोलीस दलाचा महत्त्वाचा घटक असून गुन्ह्यांचा तपास किंवा स्फोटक शोध व बचाव मोहिमांत श्वान सगळ्यात पुढे असतो. पण १० वर्षांनंतर निवृत्त होताच या श्वानाला पोलीस दल सोडावे लागते. पण आता हे मुके शिलेदार पोलीस दलातच कायमस्वरूपी राहणार आहेत. त्यांची निवृत्तीनंतरची तगमग मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संवेदनशील निर्णयामुळे थांबणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांना गृह विभागाने पोलीस श्वान पथकातील निवृत्त होणाऱ्या श्वानांच्या या परिस्थितीतबाबत एक अहवाल सादर केला. असा श्वान केवळ ६ ते ९ आठवड्यांचा असताना पोलीस दलात दाखल होतो. या दरम्यान अनेक आव्हानात्मक आघाड्यांवर हा श्वान पोलीस दलाचा वाटाड्या ठरतो. अगदी स्फोटकांना शोधून काढण्यापासून ते गुन्हेगारांचा माग काढण्यात हा श्वान जीवतोड मेहनत करतो. अनेक जोखमीच्या ठिकाणी तसेच अमली पदार्थ शोधून काढण्यासाठी श्वानांची मदत घेतली जाते.

श्वानांचा सेवाकाळ १० वर्षांचा

या श्वानांचा सेवाकाळ १० वर्षांचा असतो. तो संपल्यानंतर त्याला सन्मानपूर्वक सक्षम अशा ठिकाणी दत्तक देण्याची कार्यपद्धती अवलंबली जाते. पण अशा पालकांकडे गेल्यावरही या श्वानांनी पोलिसांतील अधिकारी-रखवालदार कर्मचारी यांचा सहवास न मिळाल्यामुळे अंतिम काळात अन्नत्याग केल्याचे निदर्शनाला आले आहे.

प्राणीप्रेमींकडून स्वागत

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या निर्णयामुळे पोलीस दलाचा अविभाज्य घटक असलेल्या श्वान पथकांतील या मुक्या शूर शिलेदारांच्या उर्वरित आयुष्याची योग्य आणि सन्मानाजनक काळजी घेतली जाई. प्राणीप्रेमी आणि श्वान प्रेमींनी मुख्यमंत्र्यांच्या या संवेदनशील निर्णयाचे स्वागत केले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पदपथांवरील 'आरे' स्टॉलवरही हातोडा; 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत BMC करणार कारवाई; मुंबईतील १६०३ स्टॉलधारकांवर टांगती तलवार

तुकाराम मुंढे 'इफेक्ट'मुळे सलग दूध संकलनात घट; तीन महिन्यांत सव्वा लाख लिटरची घट, भेसळखोरांनी घेतला धसका

आयआयटी मुंबईच्या ६२० संशोधकांना PHD; एकाच शैक्षणिक वर्षात गाठला संशोधनातील ऐतिहासिक टप्पा

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

JNPT येथून पहिली 'डबल-स्टॅक लाँग-हॉल' कंटेनर ट्रेन धावली; ३६० टीईयू माल घेऊन ४२२ किमीचा प्रवास वेळ वाचणार; पोर्टवरील गर्दी कमी होणार