महाराष्ट्र

‘मर्फी’ ठरला गुन्हेगारांचा कर्दनकाळ; आरोपींना जेरबंद करण्यामध्ये पोलीस दलातील श्वानाची महत्त्वपूर्ण भूमिका

Swapnil S

धनंजय कवठेकर/अलिबाग : चोरी, घरफोडी, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यामध्ये रायगड पोलीस दलातील श्वान पथकामधील मर्फी श्वानाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पेण, महाड व मुरूड येथील अनेक गुन्हे त्याच्या प्रयत्नाने उघडकीस आणून गुन्हेगारांना पकडून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून तो ओळखला जात आहे.

रायगड पोलीस दलातील श्वान पथकामध्ये मर्फी २०१७ मध्ये दाखल झाला. टेकनपूर येथे त्याचे नऊ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर २०१८ पासून तो पोलीस दलात कार्यरत आहे. घरफोड्या, खून आदी गुन्ह्यांतील आरोपींना पकडून देणे आणि मार्गदर्शन करण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा ठरला आहे. पेण तालुक्यात खून झाल्याचा गुन्हा दादर सागरी पोलीस ठाण्यामध्ये ६ मे २०२० मध्ये दाखल झाला होता.

या गुन्ह्यातील आरोपीला शोधण्यासाठी रायगड पोलिसांनी श्वान पथकाची मदत घेतली. मृताच्या अंगावर पडलेल्या कोयत्याच्या वासावरून मर्फीने खुन्याचा शोध लावला. मर्फीला कोयत्याचा वास देण्यात आला. त्या वासावर मर्फी एक दुमजली घराकडे येऊन भुंकू लागला. ते घर पाटील नामक व्यक्तीचे असल्याचे समजले. त्यानुसार पडताळणी करून पोलिसांनी तेथील आरोपीला ताब्यात घेतले आहे.

सात वर्षांत मर्फीने आणले चार गुन्हे उघडकीस

रोह्यामध्ये देखील खून झाला होता. त्या परिसरात एक कुऱ्हाड पोलिसांना दिसून आली. कुऱ्हाडीच्या दांडक्याच्या वासावरून मर्फीने खून करणाऱ्या आरोपीचा शोध काही तासातच लावला. अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांची उकल करण्यात मर्फीला यश आले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे चोरी, घरफोडीबरोबरच खून करणाऱ्या आरोपींपर्यंत पोहोचता आले. सात वर्षांत मर्फीने चार गुन्हे उघडकीस आणले असून, १७ गुन्ह्यांसाठी पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त