महाराष्ट्र

एन. डी. स्टुडिओ आता राज्य सरकारच्या ताब्यात; सांस्कृतिक कार्य विभागाकडून पाहणी

दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जत येथील एन. डी. स्टुडिओ राज्य सरकारने ताब्यात घेतला असून तो गोरेगाव फिल्मसिटीच्या अखत्यारित चालविण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवारी एन. डी. स्टुडिओला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली.

Swapnil S

मुंबई : दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जत येथील एन. डी. स्टुडिओ राज्य सरकारने ताब्यात घेतला असून तो गोरेगाव फिल्मसिटीच्या अखत्यारित चालविण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवारी एन. डी. स्टुडिओला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने हा स्टुडिओ ताब्यात घेतला असून एन. डी. स्टुडिओचे परिचालन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर, उपसचिव महेश व्हावळ, मुख्य लेखावित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, विशेष कार्यकारी अधिकारी संजय कृष्णाजी पाटील, कक्ष अधिकारी अनिरुद्ध देशपांडे यांनी या स्टुडिओला भेट देऊन पाहणी केली.

स्टुडिओतील कामकाज जाणून घेण्यासाठी खारगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने एन.डी. स्टुडिओची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच येथील कार्यरत असलेल्या व्यवस्थापनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधून नियमित कार्यप्रणाली समजून घेतली.

प्रशासकीय आणि विकासात्मक कामांमध्ये सुसूत्रता येण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक यांच्या नियंत्रणाखाली विशेष कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात सहव्यवस्थापकीय संचालक समन्वयक, विशेष कार्यकारी अधिकारी उपसमन्वयक, मुख्य प्रशासकीय अधिकारी, मुख्य लेखावित्तधिकारी, व्यवस्थापक कलागारे, उपअभियंता (स्थापत्य), उपअभियंता (विद्युत) आदि अधिकारी सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. तसेच वित्तीय, विधी, आयटी, मनुष्यबळ आदि क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागारांचा समावेश आहे.

सध्या या स्टुडिओचे काम व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर आणि विशेष कार्यकारी अधिकारी संजय कृष्णाजी पाटील पाहणार आहेत.

स्टुडिओवर महामंडळाचे नियंत्रण

राष्ट्रीय कंपनी विधी प्राधिकरणाने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यामुळे एन. डी. स्टुडिओचे दैनंदिन प्रशासन, सुरक्षा, चित्रीकरणे, महसूल वाढ, लेखा विषयक कामे शासनाच्या वतीने महामंडळाच्या नियंत्रणाखाली सुरू राहणार आहेत.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री