Nagpur : मॅट्रिमोनियल साईटवरील ओळख महागात पडली; मॉर्फ अश्लील व्हिडिओने ३६ वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

Nagpur : मॅट्रिमोनियल साईटवरील ओळख महागात पडली; मॉर्फ अश्लील व्हिडिओने ३६ वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल

लग्न जुळवणाऱ्या वेबसाइटवरून सुरू झालेली ओळख एका ३६ वर्षीय इव्हेंट ऑर्गनायझरसाठी धक्कादायक ठरली. महिलेच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून भामट्याने आधी विश्वास संपादन केला आणि नंतर व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्याला जाळ्यात ओढलं. त्यानंतर मॉर्फ केलेला अश्लील व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याची घटना नागपुरात समोर आली आहे.

Mayuri Gawade

नागपूरमधील ३६ वर्षीय इव्हेंट ऑर्गनायझरची मॅट्रिमोनियल साइटवरून फसवणुक केल्याची घटना समोर आली आहे. एका महिलेच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून फसवणूक करणाऱ्याने त्याला जाळ्यात ओढले आणि नंतर मॉर्फ केलेल्या अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल केले.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीची ओळख एका मॅट्रिमोनियल वेबसाइटवर झाली होती. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवर संवाद सुरू झाला. स्वतःला हैदराबादमधील महिला असल्याचे सांगणाऱ्या आरोपीने २ जानेवारी रोजी संपर्क साधला.

सुरुवातीला साधे मेसेज पाठवण्यापासून सुरू झालेला संवाद ८ मार्च रोजी भीषण वळणावर गेला. अवघ्या २७ सेकंदांच्या व्हिडिओ कॉलदरम्यान आरोपीने तक्रारदाराचा फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत त्याच्याच चेहऱ्याचा वापर करून एक मॉर्फ केलेला अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आला.

ब्लॅकमेलचा डाव

यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तक्रारदाराकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे तक्रारदाराला मोठा मानसिक धक्का बसला.

तपास सुरू

या प्रकारानंतर पिडीत तरुणाने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. डिजिटल पुरावे, व्हॉट्सअ‍ॅप संपर्क आणि बनावट प्रोफाइलची माहिती तपासली जात आहे.

ऑफिसमध्ये WhatsApp Web वापरताय? लॉगआउट न करताच निघू नका; गृह मंत्रालयाचा इशारा, वाचा सविस्तर

Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ; २०१८ च्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

Solapur : बोअरवेलमध्ये पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रात्रभर बचावकार्य सुरू, पण प्रयत्न अपयशी, पंढरपुरात हळहळ

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या बाटलीबंद पाण्यावर FSSAI ची कारवाई; कंपनीचं स्पष्टीकरण समोर, नेमकं प्रकरण काय?

Chhatrapati Sambhajinagar : प्रवासी झोपेत असतानाच खासगी बसची पुलाच्या कठड्याला जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, २७ जखमी