महाराष्ट्र

फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन, आरोपी अटकेत; कारण ऐकून तुम्हीही व्हाल अवाक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन पोलिसांना आला आणि मोठी खळबळ उडाली

प्रतिनिधी

काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरातील घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा एक फोन नागपूर पोलिसांना आला. यामुळे एकच खळबळ उडाली. हा फोन येताच पोलिसांनी कारवाई करत त्यांच्या घरी बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर हा फेक फोन असून फोन करणाऱ्याचा शोध पोलिसांनी घेतला. आरोपीने असा फोन का केला? त्याचे कारण ऐकून सर्वजण अवाक झाले.

नागपूर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. यावेळी घरची लाईट गेली म्हणून वैतागून त्याने नागपूर पोलीस कंट्रोल रूमला असा फोन केला, असे त्याने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री २ वाजता उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब ठेवला असल्याची धमकी देणारा फोन कंट्रोल रूमला आला. हा फोन येताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली आणि त्यांच्या घरी बॉम्ब शोधक पथक पाठवून पूर्णपणे तपासणी करण्यात आली. यावेळी हा फोन फेक असल्याचे समोर आले. ज्या भागातून हा फोन आला, त्या परिसरामध्ये पोलिसांनी तपासणी केली. कन्हान या भागामध्ये चौकशी केली, फोन करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले