महाराष्ट्र

Nanded : पुन्हा महाराष्ट्र हादरला! पोटच्या मुलीचा बापाने घेतला जीव; नेमकं प्रकरण काय?

नांदेडमध्ये (Nanded) वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीची वडील आणि भावानेच केली हत्या, मुलीच्या मैत्रिणीने केलेल्या तक्रारीनंतर समोर आले प्रकरण

प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या नांदेडमध्ये (Nanded) घडलेल्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. भावांनी आणि जन्मदात्या पित्यानेच मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्या केलेल्या मुलीच्या मैत्रिणीने राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. नांदेडमधील महिपाल पिंपरी येथील ही घटना असून या घटनेचा पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीचे वडिलांसहित ४ जणांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हत्या केलेल्या मुलीचे नात्यातील मुलाशी प्रेमसंबध असल्याचे तिच्या घरच्यांना कळले होते. यानंतर मुलीला तिच्या वडिलांनी भावासह मारहाण करत तिची हत्या केली. मृत मुलगी ही वैद्यकीय शिक्षण घेत होती. प्रेमसंबंधाची माहिती मिळताच त्यांनी मारहाण केली. यानंतर तिची हत्या करून तिला जाळून तिची राख इतरत्र पसरवली असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही घटना रविवारी घडली असून गुरुवारी रात्री यासंबंधी ५ जणांवर ३०२ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत मुलीचे वडील भाऊ, मामा, दोन चुलतभाऊ अशा ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२