प्रातिनिधिक छायाचित्र  
महाराष्ट्र

नांदेड-मुंबई व नांदेड-गोवा विमानसेवा १५ नोव्हेंबरपासून

या सेवा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असतील. मुंबई - नांदेड विमान दररोज दुपारी ४.४५ वाजता मुंबईहून उड्डाण करून सायंकाळी ५.५५ वाजता नांदेडच्या श्री गुरू गोबिंदसिंघजी विमानतळावर उतरेल.

Swapnil S

नांदेड : माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, नांदेड-मुंबई आणि नांदेड-गोवा या बहुप्रतीक्षित विमानसेवा येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. नांदेड - मुंबई विमानसेवेसाठी नवी मुंबई विमानतळाऐवजी मुंबईतील मुख्य विमानतळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्लॉट देण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी केली होती. ती मागणी देखील मंजूर झाली आहे. अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सेवा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असतील. मुंबई - नांदेड विमान दररोज दुपारी ४.४५ वाजता मुंबईहून उड्डाण करून सायंकाळी ५.५५ वाजता नांदेडच्या श्री गुरू गोबिंदसिंघजी विमानतळावर उतरेल. त्याच विमानाचे सायंकाळी ६.२५ वाजता उड्डाण होऊन रात्री ७.३५ वाजता ते मुंबई विमानतळावर पोहोचेल. गोव्याच्या मोपा विमानतळावरून नांदेडला येणारे विमान दुपारी १२ वाजता उड्डाण करेल.

महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश : किरकोळ अपराधासाठी आता फक्त दंड, तुरुंगवास नाही; ७ कायद्यांतील छोटे गुन्हे 'डिक्रिमिनलाइज'

Navi Mumbai : वन खात्याच्या बोटचेप्या धोरणाचा फटका महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना; आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटीसह अनेकांवर परिणाम

तिरुमला तिरुपती देवस्थानास वांद्रे येथील जमीन; ३० वर्षांसाठी नाममात्र १ रुपया भाडे; ३९५ चौ.मी जमिनीवर पार्किंग, कार्यालय

Mumbai : बिग बींची स्मार्ट गुंतवणूक! अमिताभ बच्चन यांनी विकले गोरेगावमधील दोन आलिशान फ्लॅट्स; १३ वर्षांत तब्बल ३.८ कोटींचा नफा

'पान मसाला' जाहिरातीवरून सलमान खानला नोटीस; भाजप नेत्याने दाखल केली तक्रार