नांदेड हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या Photo-X
महाराष्ट्र

नांदेड हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

जवळा मुरार (ता. मुदखेड) येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, या गावातील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Swapnil S

नांदेड : जवळा मुरार (ता. मुदखेड) येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, या गावातील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दोन मुलांनी रेल्वेखाली उडी मारून आपलं आयुष्य संपवलं आहे, तर त्यांचे आई-वडील घरात मृतावस्थेत आढळले. त्यामुळे या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जवळा मुरार गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पहायला मिळतो. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूमागील कारण काय आहे, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. बजरंग रमेश लखे (२२) आणि उमेश रमेश लखे (२५) या दोन सख्ख्या भावांनी मुगट रेल्वेस्थानक परिसरात रेल्वेखाली उडी मारून आपलं आयुष्य संपवले. तर दुसरीकडे त्यांचे वडील रमेश होनाजी लखे (५१), आई राधाबाई रमेश लखे (४४) हे दोघे त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. मोठा मुलगा उमेश लखे हा मनसेचा मुदखेडचा माजी तालुका उपाध्यक्ष असल्याची माहिती समोर येत आहे. तर सामाजिक कार्यातही उमेशचा सक्रिय सहभाग होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बजरंग, उमेश, रमेश आणि राधाबाई लखे या चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या चौघांचे कोणाशी वाद होते का, कौटुंबिक वादातून असं टोकाचं पाऊल उचललंय का किंवा त्यांचा घातपात झालाय का, याचा तपास पोलीस करत आहेत.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चना पाटील यांनी तासभर जवळा मुरार येथे घटनेची माहिती घेतली. फॉरेन्सिक लॅबही घटनास्थळी हजर होते, अशी घटना पहिल्यांदाच घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भारत १ ट्रिलियन डॉलरचे निर्यात लक्ष्य गाठणे कठीण; जागतिक मंदीमुळे निर्यातीचा वेग मंदावला: GTRI

पेट्रोल पंपांमध्ये भारत जगात तिसरा! संख्या १ लाखांवर, १० वर्षांत दुप्पट वाढ; टॉप २ देश कोणते?

ठाकरे बंधूंच्या युतीनंतर ठाणे-नवी मुंबईत ताणतणाव; महाविकास आघाडीत जागेचा पेच कायम

नातवाला दिल्लीतून मुंबईला आणा, ९० वर्षीय आजीची भेट घडवून द्या; HC चा महत्त्वपूर्ण आदेश

कॅनडाच्या टोरंटो विद्यापीठाजवळ भारतीय विद्यार्थ्याची हत्या; हल्लेखोर फरार, आठवड्याभरातील दुसऱ्या घटनेमुळे खळबळ