लाचखोरी प्रकरण : मंत्री झिरवाळ यांचे खासगी सचिव गाडे कार्यमुक्त; तत्काळ कारवाई करीत मूळ विभागात रवानगी  
महाराष्ट्र

लाचखोरी प्रकरण : मंत्री झिरवाळ यांचे खासगी सचिव गाडे कार्यमुक्त; तत्काळ कारवाई करीत मूळ विभागात रवानगी

मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेले राजेंद्र ढेरिंगे यांच्यावरील कारवाईनंतर झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांचेही नाव पुढे येऊ लागले आहे. याप्रकरणी मंत्री झिरवाळ यांनी तत्काळ कारवाई करीत रामदास गाडे यांना आपल्या स्वीय सहाय्यक पदावरून कार्यमुक्त केले असून त्यांची रवानगी मूळ विभागात केली आहे.

Swapnil S

मुंबई : मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेले राजेंद्र ढेरिंगे यांच्यावरील कारवाईनंतर झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांचेही नाव पुढे येऊ लागले आहे. याप्रकरणी मंत्री झिरवाळ यांनी तत्काळ कारवाई करीत रामदास गाडे यांना आपल्या स्वीय सहाय्यक पदावरून कार्यमुक्त केले असून त्यांची रवानगी मूळ विभागात केली आहे.

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अन्न व औषध प्रशासन खात्यातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. सध्या ढेरिंगे पोलिस कोठडीत आहे. त्याने झिरवाळ यांचे स्वीय सहाय्यक रामदास गाडे याचे नाव घेतल्याची माहिती आहे. त्यादिवशी गाडे दिल्लीत मंत्री झिरवाळ यांच्याबरोबर असल्याचे सांगितले जात असले तरी आता झिरवाळ यांनी गाडे यांच्यावरही कार्यवाही केली आहे.

यासंबंधीचे पत्र त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपले खाजगी सचिव डॉक्टर रामदास गाडे यांना तातडीने पदावरून कार्यमुक्त केले आहे. गाडे हे झिरवाळ यांच्या मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर होते. पण आता त्यांची सेवा त्यांच्या मूळ विभागात (कृषि व पदुम विभाग) वर्ग करण्यात आली आहे. झिरवाळ यांनी याप्रकरणी सामान्य प्रशासन विभागाला तातडीने आदेश काढण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, मंत्री झिरवाळ यांनी प्रकरणाशी आपला संबंध आढळला तर आपण स्वतःहून राजीनामा देऊ, असे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर झिरवाळ यांनी उपरोक्त कारवाई केली आहे. विरोधकांनी याप्रकरणी नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मंत्रालयातील लाचखोरीचा एक व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ शूट करणाऱ्या निर्मल शर्मा यांनी झिरवाळ यांच्या कार्यालयात पैशांचा कसा व्यवहार चालतो? हे सांगितले होते. त्यांच्या माहितीनुसार, प्रस्तुत प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांचाही समावेश आहे. अन्न व औषध प्रशासन खात्याच्या कार्यालयात येणाऱ्या फाईल्सवर लाल, हिरव्या पट्ट्या मारून त्यावर कुणाला किती पैसे द्यायचे हे विशेष खूण करून लिहिले जायचे. विशेष म्हणजे या मेडिकल सस्पेन्शनच्या सुनावण्या मंत्री घेत नव्हते, तर त्यांचे अधिकारी घेत होते. याप्रकरणी कुणाचीही ओळख सांगितली तरी या विभागात पैसे द्यावेच लागतात, असा आरोप निर्मल शर्मा यांनी केला.

लाचखोर लिपिक राजेंद्र ढेरिंगेला जामीन मंजूर

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विभागातील लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या लिपिक राजेंद्र ढेरिंगेला जामीन मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील ‘एसीबी’च्या विशेष न्यायालयाने ढेरिंगेला जामीन मंजूर केला. राजेंद्र ढेरिंगेची न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच त्याच्या जामिनावर सुनावणी घेण्यात आली आणि त्यात त्याला दिलासा मिळाला आहे.

शिमग्याला गावी जाणाऱ्या कोकणकरांसाठी गुड न्यूज! मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी १ मार्चपासून; पाहा वेळापत्रक आणि तिकीट दर

नागपुरात १२ वीचा केमिस्ट्री पेपर लीक! विद्यार्थिनीच्या वारंवार वॉशरूमला जाण्यामुळे आली शंका; मोबाईलमध्ये सापडला पुरावा

आता शिळफाटा रस्त्यावर मेट्रोने प्रवास; मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा; MMRDA च्या अर्थसंकल्पात समावेश

Mumbai : मोनोरेल पुन्हा धावणार! सीसीटीव्ही, चार्जिंग पॉइंट्स, स्मार्ट सिग्नलिंग अशा २१ नव्या सुविधांसह सज्ज; MMRDA ची घोषणा

महामार्गावर टोलवसुली होणार कॅशलेस; १ एप्रिलपासून अंमलबजावणीचे संकेत