Nashik : कुंभमेळा वाहतुकीसाठी ७०० कोटी हवेत; नाशिक महापौरांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडे 
महाराष्ट्र

Nashik : कुंभमेळा वाहतुकीसाठी ७०० कोटी हवेत; नाशिक महापौरांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडे

नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील वाहतूक व्यवस्थापनासाठी महापौर हिमगौरी आडके यांनी थेट केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले आहेत.

Swapnil S

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील वाहतूक व्यवस्थापनासाठी महापौर हिमगौरी आडके यांनी थेट केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले आहेत. आडके यांनी उपमहापौर विलास शिंदे आणि स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्यासह नागपूर येथे जाऊन गडकरी यांच्यासोबत बैठक घेत वाहतूक व्यवस्थापनासाठी सुमारे ७०० कोटींची मागणी केली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी प्रशासकीय स्तरावर लगबग सुरु असताना यंदा मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहराच्या दळणवळण व्यवस्थेला नवा आयाम देण्याची गरज लक्षात घेऊन महापौर-उपमहापौरांनी गडकरी यांची भेट घेतली. सदर बैठकीमध्ये कुंभमेळा नियोजनावर सविस्तर चर्चा झाली. विशेषतः, शहरांतर्गत रस्ते, लगतचे महामार्ग रुंदीकरण, उड्डाणपूल याबाबत उहापोह झाल्याची माहिती महापौरांनी दिली. यावर मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अत्यावश्यक कामांच्या यादीसह नवी दिल्लीत चर्चेला येण्याचे निमंत्रण नाशिक महापालिका पदाधिकाऱ्यांना दिले.

५० टक्के रस्त्यांनाच हिरवा कंदील

नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील प्रस्तावित सिंहस्थ कुंभमेळा लौकिकाला साजेसा व्हावा, यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होत आहेत. विशेषतः, पायाभूत सुविधा निर्माणासाठी कुठेही त्रुटी राहू नयेत, याची दक्षता घेतली जात आहे. तथापि, प्रशासकीय पातळीवर अनेक कामांच्या मंजुरी रखडल्याची पदाधिकाऱ्यांची भावना आहे. महापालिकेने एकूण २४० किलोमीटरचे सुमारे तीन हजार कोटींचे रस्ते प्रस्तावित केले असताना प्रत्यक्षात ५० टक्के रस्त्यांनाच हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. शहरात उभारण्यात येणाऱ्या पुलांची देखील अशीच परिस्थिती आहे. १७ प्रस्तावित पूल असताना केवळ चार पूल मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या सोबत नवी दिल्लीत होणाऱ्या भेटीत त्यावर तोडगा निघतो का, याबाबत पदाधिकारी आशावादी आहेत.

UPI व्यवहारांवरील MDR शुल्काला तूर्तास ब्रेक! सणासुदीत NPCI चा मोठा निर्णय, आता कधीपासून मोजावे लागणार पैसे?

Nalasopara : लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; आणखी ७० ते ८० महिलांच्या शोषणाचाही आरोप

Punjab : फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच गोळीबार; ड्रग्सविरोधी कार्यकर्ते परविंदर झोटा यांची हत्या, Video

मुंबईकरांनो, पाण्याचा गैरवापर केला तर कारवाई! २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे आव्हान, १० टक्के पाणीकपात कायम

Cyber Scam : व्हॉट्सॲपवर आलेल्या 'त्या' मेसेजला 'NO' रिप्लाय करताय? बँक खातं होऊ शकतं रिकामं; पोलिसांचा इशारा