प्रातिनिधिक छायाचित्र canva
महाराष्ट्र

Nashik News: "साइनिंग ऑफ फ्रॉम लाइफ...३ वर्षांपूर्वीच मरणार होतो, पण गर्लफ्रेंडमुळे..."; Insta पोस्ट करीत विद्यार्थ्याची आत्महत्या

इन्स्टाग्राम खात्यावर भावनिक पोस्ट शेअर करत शहरातील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Krantee V. Kale

नाशिक : आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर भावनिक पोस्ट शेअर करत शहरातील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आयुष योगेश चव्हाण ( १७ )असे विद्यार्थ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, गंगापूर रोडवरील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शनिवारी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. गंगापूर पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट तपासासाठी महत्त्वाची ठरत असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

आत्महत्येपूर्वी केली इमोशनल पोस्ट

“हाय गाइज...तुम्ही मला शेवटचं ऐकत आहात मित्रांनो... माझ्या आयुष्यात आता कोणतेही ध्येय किंवा स्वप्न उरलेले नाही... माझं अस्तित्व अनेकांसाठी त्रासदायक ठरत आहे...मी ३ वर्षांपूर्वीच मरणार होतो, पण माझ्या गर्लफ्रेंडमुळे आणखी तीन वर्षे जगलो. तुम्हाला सगळ्यांना माहितीये की मी शाळेपासूनच त्रासात आणि नैराश्यात होतो. आता मात्र तो टोकाला पोहोचलाय. सो, मी आता तेच करणार आहे. जे माझ्या आयुष्यात होते, त्या सर्वांना धन्यवाद. माझे कुटुंबीय, मित्र आणि हितचिंतकांना 'लव्ह यू'. तुम्ही काहीच चुकीचं केलं नाही, मीच पात्र नव्हतो. सर्वांचे आणि पालकांचे प्रयत्न वाया घालवल्याबद्दल व्हेरी व्हेरी सॉरी. साइनिंग ऑफ फ्रॉम लाइफ...गूड बाय” अशी हृदयद्रावक पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा; काळू धरण प्रकल्प लवकर पूर्ण होणार, एकनाथ शिंदेंचे आश्वासन

कारवाई तर होणारच! इंडिगोच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांचा थेट इशारा

भाजप खासदाराच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळे थिरकल्या; कंगना रणौतचाही व्हिडीओ व्हायरल

स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; दोघांचीही सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर