महाराष्ट्र

'आई तुला त्रास द्यायचा नाही, माझा शैक्षणिक खर्च फार आहे'...नाशकात महिला पोलिसाच्या लेकीचं टोकाचं पाऊल

'आई तुला त्रास द्यायचा नाही. माझा शैक्षणिक खर्च फार आहे. तू काळजी करू नकोस. तुझी धावपळ होते...

Krantee V. Kale

लासलगाव : नाशिकजवळील आडगाव येथील एका २० वर्षीय विद्यार्थिनीने, 'आई माझ्या शिक्षणाची काळजी घेऊ नको, अशी भानविक चिठ्ठी लिहित आपली जीवन यात्रा संपविली. सदर मुलीची आई पोलिस ठाण्यात अंमलदार आहे. तिने गळफास घेण्यापूर्वी आईला चिठ्ठी लिहिली आहे. पूजा दीपक डांबरे (२०, रा. विहंग अपार्टमेंट, व्ही. डी. कामगार नगर,अमृतधाम,पंचवटी) असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

नुकतीच बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिने प्रथम वर्षात प्रवेश घेत महाविद्यालयीन शिक्षण सुरु केले होते. पूजाचे वडील विभक्त राहत असून ती आईसोबत राहात होती. 'आई तुला त्रास द्यायचा नाही. माझा शैक्षणिक खर्च फार आहे. तू काळजी करू नकोस. तुझी धावपळ होते, असे मुलीने चिठ्ठीत लिहिले आहे.

कौटुंबिक अडचणी आणि मानसिक तणावामुळे पूजा गेल्या काही दिवसांपासून खचून गेली होती. आई पोलिस खात्यात कार्यरत असल्याने दोघींवर कौटुंबिक आणि घरच्या जबाबदाऱ्यांचा ताण होता. या तणावातूनच पूजाने राहत्या घरातील हॉलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले. हा प्रकार लक्षात येताच तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईकरांसाठी आनंद वार्ता! वर्षअखेर ५० किमी मेट्रो मार्ग येणार सेवेत; MMRDA चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची माहिती

IND Vs ENG: भारतापुढे बरोबरी साधण्याचे आव्हान! आजपासून इंग्लंडविरुद्ध चौथी कसोटी, योग्य संघनिवडीचा गिल-गंभीरसमोर पेच

येऊर परिसरात गटारीला ‘नो एन्ट्री’; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

सोने पुन्हा १ लाखांवर; चांदीचा भाव ३,००० रुपयांनी वाढला

‘मिग-२१’ लढाऊ विमान निवृत्त होणार; ‘उडती शवपेटी’ म्हणून ओळख, १९ सप्टेंबरला एक ‘अध्याय’ संपणार