फाशी नको, त्याला ठेचून मारा, जिवंत जाळा; नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या पत्नीचा संताप प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

फाशी नको, त्याला ठेचून मारा, जिवंत जाळा; नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या पत्नीचा संताप

पुण्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. ‘आरोपीला जिवंत जाळा...उभं जाळा...मला त्याचं तोंडही पाहायचे नाही. त्याचा अंत्यविधी झाला तरी मला कुणी सांगायला पण येऊ नका...फाशीची शिक्षा त्याच्यासाठी किरकोळ आहे, त्याला जिवंत जाळले पाहिजे’, अशा संतप्त प्रतिक्रिया आरोपीच्या पत्नीने व्यक्त केल्या.

Swapnil S

पुणे : पुण्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. आरोपीला कोर्टाने मंगळवारी ५ दिवसांची कोठडी सुनावली आहे. ‘आरोपीला जिवंत जाळा...उभं जाळा...मला त्याचं तोंडही पाहायचे नाही. त्याचा अंत्यविधी झाला तरी मला कुणी सांगायला पण येऊ नका...फाशीची शिक्षा त्याच्यासाठी किरकोळ आहे, त्याला जिवंत जाळले पाहिजे’, अशा संतप्त प्रतिक्रिया आरोपीच्या पत्नीने व्यक्त केल्या.

या प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांनी पत्रकारांसमोर संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. आरोपीने केलेले हे पहिले नव्हे तर तिसरे कृत्य आहे. याआधी पुराने नसल्याने तो दोन वेळा निर्दोष सुटला आहे. त्यामुळे किमान या प्रकरणात तरी त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटत आहे.

आरोपीचा मुलगा म्हणाला की, ‘मला बाप म्हणून त्याला स्वीकारण्याची लाज वाटते. माझी एकच चूक आहे की मी त्याच्या पोटी जन्मलो. सरकारने त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी. त्याला ठेचून मारायला हवं. त्याने केलेला गुन्हा माफ करण्यासारखा नाही. त्या निष्पाप मुलीला न्याय मिळाला पाहिजे, पीडित मुलगी माझ्या भाचीसारखी होती, असेही आरोपीच्या मुलाने सांगितले.

आरोपीची पत्नी म्हणाली, ‘मला अकरा नातवंडे आहेत. त्या निष्पाप बाळाच्या आत्म्याला काय वाटलं असेल? तिच्या आईच्या काळजाचा तुकडा गेला, तिला काय वाटत असेल, याची मी कल्पना करू शकते. मी सुद्धा कुणाची तरी आईच आहे. घटना घडल्यापासून माझ्या घशाखाली अन्नाचा घास उतरलेला नाही, असेही आरोपीची पत्नी म्हणाली. आरोपी पतीसोबत आमचा गेल्या १० वर्षांपासून कोणताही संबंध नाही. मी आणि माझा मुलगा दोघेच एकत्र राहतो. या १० वर्षांत आम्ही अनेकदा त्याला घरी बोलावण्याचा, नीट वागण्यासाठी प्रयत्न केला. पण तो नेहमी 'तुझं तू बघ' असे म्हणून आम्हाला झिडकारायचा, अशी प्रतिक्रियाही आरोपीच्या पत्नीने दिली.

पीडितेच्या तोंडात सॉक्स

पीडित मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन कॅमेऱ्यादेखत होणार असल्याचे आधीच समोर आले होते. आता या प्रक्रियेच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित मुलीच्या तोंडात सॉक्स आढळला आहे. तिच्या छातीवरही गंभीर व्रण उमटल्याचे दिसत होते. नसरापूरमधील घटनेसंदर्भातील ही माहिती अत्यंत हादरवणारी असून पुढील तपासालाही वेग आला आहे. संबंधित प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

नसरापूर प्रकरण: अत्याचाराच्या आरोपींना पॅरोल नको - मुख्यमंत्री फडणवीस

राजीनाम्यास नकार! 'निवडणूक आयुक्त म्हणजे खलनायक: मी स्ट्रीट फायटर, रस्त्यावर उतरून लढेन'; निवडणुकीच्या निकालानंतर ममता अधिक आक्रमक

"होय, जागा लुटल्या गेल्या"; ममता बॅनर्जींशी राहुल गांधी सहमत

माळशेज घाट रस्त्यावर भीषण अपघात, ४ ठार; अपघातांची मालिका सुरूच

Maharashtra Weather Update : मुंबईसह कोकणाला 'यलो' अलर्ट