अपघात प्रातिनिधिक फोटो
महाराष्ट्र

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याच्या फॉर्च्युनरची दुचाकीला धडक, १९ वर्षीय तरूणाचा मृत्यू

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयूर मोहिते याच्या फॉर्च्युनर कारनं दिलेल्या धडकेत एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल घडली.

Suraj Sakunde

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयूर मोहिते याच्या फॉर्च्युनर कारनं दिलेल्या धडकेत एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल घडली. पुणे-नाशिक महामार्गावर कळंब येथे काल मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. पोलिसांनी मयुर मोहिते याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयूर मोहिते याच्या भरधाव वेगातील फॉर्च्युनर कारनं काल मध्यरात्री एका दुचाकीला दिलेल्या धडकेत ओम सुनील भालेराव (वय १९) हा तरूण जागीच ठार झाला, तर एकजण जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मयुर मोहिते आपल्या फॉर्च्युनर कारमधून कळंबकडून मंचरच्या दिशेने चालला होता.

यावेळी एकलहरे गावच्या हद्दीत एका पिकअपला ओव्हरटेक करण्याच्या नादात मयुर याच्या भरधाव वेगातील फॉर्च्युनरनं दुचाकीवरून चाललेल्या ओम भालेराव याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दरम्यान अपघातानंतर मयूर मोहितेनं पळ काढण्याचा प्रयत्न करत होता, मात्र स्थानिकानं त्याला रोखलं आणि आपली गाडी त्याच्या गाडीसमोर आडवी लावली. यावेळी मयुर गाडीतून खाली उतरण्यासही तयार नव्हता मात्र स्थानिकांनी त्याला गाडीतून बाहेर येण्यास भाग पाडलं.

जखमी अवस्थेतील ओम भालेराव याला उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयुर मोहिते याच्याविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

पृथ्वीराज चव्हाण, विखे-पाटील यांना कोर्टाचा दिलासा

चेंगराचेंगरी हा द्रमुकाचा कट; विजय थलापतींचा आरोप; उच्च न्यायालयात धाव

GST दर कपातीनंतर NCH ला तीन हजार तक्रारी प्राप्त; ग्राहक व्यवहार सचिवांची माहिती