महाराष्ट्र

अनिष्ट विधवा प्रथेचे निरोम ग्रामस्थांनी केले निर्मूलन

आपल्या गावामध्ये व समाजात विधवा महीलाना सन्मानाने जगता यावे म्हणून गावातील काही जाणत्या लोकांनी आणि मुंबईकर ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घेतला

प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जिवन जगण्याचा अधिकार बहाल केलेला असताना समाजातील अनिष्ट विधवा प्रथेमुळे महिलांच्या या अधिकारांवर गदा येत असल्याचे सामाजिक भान ठेवत मालवण तालुक्यातील निरोम ग्रामस्थांनी या अनिष्ट प्रथेचे गावातून निर्मूलन केले आहे. तालुक्यात अशी स्वागतार्ह भूमिका घेणारे हे पहिलेच गाव आहे.

आपल्या गावामध्ये व समाजात विधवा महीलाना सन्मानाने जगता यावे म्हणून गावातील काही जाणत्या लोकांनी आणि मुंबईकर ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घेतला होता. निरोम ग्रामपंचायतीत सरपंच उमेश मांजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत तानु शंकर राऊत (गुरुजी) यानी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव मांडला व सौ. विशाखा विनायक राऊत तसेच उपसरपंच राजू राऊत व समस्त गावकऱ्यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. सर्वानुमते संमत करण्यात आलेला हा ठराव ग्रामसेवक भगवान जाधव यांनी दाखल करून घेतला आहे.

निरोम गाव हे समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध एल्गार करण्यात नेहमीच आघाडीवर असेल असा विश्वास निरोमवासीयांच्या वतीने निरोम ग्रामस्थ मंडळ, मुंबई यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक