महाराष्ट्र

ओबीसी समाजावर कुठेही अन्याय केला नाही -फडणवीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या महायुती सरकारने मराठा समाजाला एकमताने १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा पारित केला

Swapnil S

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या महायुती सरकारने मराठा समाजाला एकमताने १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा पारित केला आहे. त्यामुळे मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे, हे करत असताना आम्ही कुठेही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू दिला नाही. त्यांचे आरक्षण अबाधित ठेवले, त्यामुळे राज्यभरात संपूर्ण मराठा व ओबीसी समाज गुण्यागोविंदाने नांदेल, याची मला खात्री आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, “मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले, पण सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारले होते. आता मागासवर्ग आयोगाने देखील जवळपास अडीच कोटींपेक्षा जास्त घरांमध्ये जाऊन सर्व्हे केला. त्यानंतर त्यांनी अहवाल दिला. त्या अहवालावर आधारित कायदा मंगळवारी पारित करण्यात आला आहे. या सर्वेक्षणासाठी साडेतीन लाख शासकीय कर्मचारी व विविध संस्थांनी काम केले. सारथी योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, यासह सर्व योजनांच्या माध्यमातून सरकार मराठा समाजाच्या विकासासाठी काम करत आहे.”

निवडणुका तोंडावर आल्या म्हणून आरक्षणाचा कायदा झाला, असा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर फडणवीस म्हणाले की, “विरोधकांची भूमिका ही विरोधीच असते. पण निवडणुका असो किंवा नसो, आम्ही आरक्षणासाठी गेल्या दीड वर्षांपासून यावर काम करत होतो.”

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी