छत्रपती संभाजीनगर : वादग्रस्त स्वयंघोषित कालिचरण महाराज यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत एक विधान केलं. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. मनोज जरांगे-पाटील म्हणजे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेले राक्षस, अशा शब्दात कालिचरण महाराज यांनी टीका केली. मनोज जरांगेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. बाबाला काही गरज नव्हती. आरक्षण आणि बाबांचा काय संबंध येतो. या बाबाने बरच सांगितले.
पत्रकारांशी बोलताना जरांगे-पाटील म्हणाले की, बाबांनी आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजे, हे त्यांचे काम आहे. आरक्षण काय हे शिकवण त्यांचे काम नाही. हा विचित्र प्राणी आहे. तू का बाबा आहे का हेंद्रया? माझ्या आई-बहिणीवर हल्ला झाला होता तेव्हा तू कुठे गेला होता? हा टिकल्या, गंध लावतो, नथ घालतो, असे म्हणत मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
कालिचरण महाराज यांचे विधान
आता एक आंदोलन सुरू झाले होते ते तुम्हाला माहिती आहे का, हिंदू- हिंदूंमध्ये फूट पाडायचे. अशी हवा होती त्या आंदोलनाची अशी हवा लाखो लोकं मुंबईत. टेन्शन काय होतं माहिती आहे? एवढे लोकं जेवतील कुठे आणि टॉयलेटला जातील कुठे? मला टेन्शन आलं की, त्यांनी आता जावं कुठे? कुठला त्यांचा नेता थडग्यावर चादर चढवेल. आला रे चादरवाला आला रे आला. हे जाती-जातीच्या आरक्षणाच्या गोष्टी नाहीत तर हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेले राक्षस आहेत. राक्षस, असे म्हणत कालिचरण महाराज यांनी मनोज जरांगेंवर टीका केली होती.