कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही; रिक्षा-टॅक्सीचालकांना १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी शिकणे सक्तीचेच 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही; रिक्षा-टॅक्सीचालकांना १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी शिकणे सक्तीचेच

अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाइन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे आहे.

Swapnil S

मुंबई : अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाइन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे आहे. त्यानंतर १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. सरनाईक म्हणाले की, मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी परिवहन विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातून राज्यभरात मराठी भाषा अभ्यास केंद्रे उभारण्यात येणार आहेत तसेच रिक्षा संघटना आणि शिवसेना शाखांमधील उपलब्ध जागांमध्येही ही केंद्रे १५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहेत.

किमान चार तासांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार

रिक्षा - टॅक्सीचालकांनी ऑनलाइन किंवा आपल्या परिसरातील प्रत्यक्ष केंद्रांमध्ये जाऊन मराठी भाषा शिकून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रशिक्षणासाठी सुमारे चार हजार शिक्षक सहभागी होणार असून प्रत्येक महिन्यातील चार शनिवार आणि रविवार चालकांच्या सोयीप्रमाणे किमान चार तासांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. काही शिक्षक मानधनाशिवाय प्रशिक्षण देणार असून काहींना प्रति तास एक हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

दोन कोटी रुपयांची तरतूद

मराठी भाषा प्रशिक्षणासाठी आवश्यक मानधनाच्या खर्चासाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. उर्वरित खर्च परिवहन विभागामार्फत करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणानंतर चालकांना प्रमाणपत्र

रिक्षा-टॅक्सीचालकांनी या उपक्रमात सहभागी होऊन यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केल्यास त्यांना परिवहन विभागामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी चालकांची मराठी भाषेवरील व्यावहारिक क्षमता तपासण्यासाठी प्रशिक्षण केंद्रांमध्ये तोंडी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली.

प्रशिक्षणासाठी करण्यात आलेली तयारी

  • सचित्र आणि सोप्या भाषेतील पाठ्यक्रम पुस्तिका तयार करण्यात आली आहे.

  • प्रत्येक केंद्रांतर्गत उपकेंद्रे उभारली जाणार आहेत.

  • रिक्षा-टॅक्सी तसेच ओला, उबेर, रॅपिडो वाहनांवर मराठी संदर्भातील जनजागृती स्टिकर्स लावले जाणार आहेत.

  • मराठी भाषा प्रचार-प्रसारासाठी विशेष बॅनर्स तयार करण्यात येत आहेत.

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता